बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आता ठाकरे सरकार मुंबईतील पावसाची जबाबदारीही मोदींवरच ढकलेल”

मुंबई | मुंबईत 104 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा महापालिकेने केलेला असतानाच पहिल्याच पावसात मुंबई तुंबली आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं मध्य आणि हार्बर रेल्वे पूर्णपणे ठप्प झाली आहे. यावरून भाजपने मुंबई महानगरपालिका तसेच ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

शिवसेनेनं केलेले सर्व दावे पहिल्याच पावसात फोल ठरले असून मुंबई शिवसेनेनं तुंबवून दाखवली आहे. तसेच आता राज्य सरकार बहुतेक पावसाची जबाबदारीही मोदींवरच ढकलेल, असा टोला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारला लगावला आहे.

मुंबई महानगरपालिकेने आज मुंबई तुंबवून दाखवली आहे. मुंबईतील नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे आम्ही आधीपासून सांगत होतो. ती बाब आता आज उघड झाली आहे. आता राज्य सरकारकडून पावसाची जबाबदारीही आता बहुतेक मोदींवर ढकलली जाईल. आता मोदींनीच त्यातून मार्ग काढावा असं राज्य सरकारने म्हणू नये अशी आमची अपेक्षा आहे, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला.

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबई पालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

थोडक्यात बातम्या- 

‘हे लग्न पूर्णपणे बेकायदेशीर होतं’; नुसरत जहांचे पतीवर गंभीर आरोप

रेल्वे रूळ की नदी?, पहिल्या पावसात मुंबईची झाली तुंबई, पाहा व्हिडीओ

आश्चर्यकारक! ‘या’ महिलेने एकाचवेळी दिला 10 मुलांना जन्म

खुशखबर! लॉकडाऊननंतर फक्त 72 रूपयांमध्ये ‘या’ ठिकाणी राहायची सोय

कौतुकास्पद! कोरोना काळात उपासमार होणाऱ्या 500 माकडांना पोलिस हवलदाराची मदत

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More