बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आता सहनशीलता संपत आली, टोकाचं पाऊल घ्यायला लावू नका’; अजित पवार संतापले

जळगाव | राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा (S.T Worker) संप अद्यापही सुरुच आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून आतापर्यंत काही कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. मात्र काही कर्मचारी विलिणीकरणाच्या मागणीवरुन अजूनही संपावर असल्याचं चित्र आहे. अशातच आता या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कर्मचाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे.

सरकारने अल्टिमेटम देऊनही संप सुरूच आहे.यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, की कामावर रुजू व्हावं. गरिबांसाठी एसटी हे मोठं साधन आहे त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी हट्ट्ला पेटणं हे बरोबर नाही.

एसटी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत अनेकदा मुभा अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे. मात्र या सगळ्याची सहनशीलता संपण्याची वेळ आली आहे. सहनशीलतेचा अंत कुणी पाहू नये. त्यामुळे टोकाची भूमिका घ्यायला लावू नका, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एसटी कर्मचारीही आपलेच आहेत आणि प्रवासीही आपलेच आहेत. त्यामुळे समजूतदारपणाची भूमिका घेणं आवश्यक आहे. त्यामुळे टोकाची भूमिका घेण्याची वेळ आणू नका, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

TET घोटाळा: राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंच्या अटकेनंतर आणखी दोन जणांना अटक

ST Employee Strike: ‘संप असाच सुरू राहिला तर…’; सरकार ‘या’ मोठ्या कारवाईच्या तयारीत

“आघाडीच्या तिन्ही पक्षांचे नेते घाबरले, कार्यकर्ते बिथरले आहेत आणि….”

IRCTCची नवी सेवा, रेल्वे तिकीट रद्द केल्यावर लगेच मिळणार परतावा

मोठी बातमी! पेपरफुटी प्रकरणात राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More