बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता पहिली ते सातवीच्या शाळांचीही घंटा वाजणार, सरकारचा मोठा निर्णय

मुंबई | शाळा हा समाज घडवण्याचं सर्वोत्तम माध्यम असतात. शाळांच्या माध्यमातूनच आपल्या येणाऱ्या भविष्याला घडवण्यात येतं. परिणामी गत वर्षापासून बंद असणाऱ्या शाळा (Schools) उघडण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न करण्यात येत होते. पण कोरोना महामारीचा लहान मुलांना असणारा धोका लक्षात घेता शाळा बंद होत्या. पण आता नियम आणि अटींच्या अधिन राहून शाळासंदर्भात सरकारनं ( goverment big Annoucment) घोषणा केली आहे.

काही दिवसांपासून अनेक गोष्टींवरील निर्बंध हटवण्यात येत आहेत. अशातच आता कोरोना टास्क फोर्स आणि सरकारच्या एकत्रित विचारानं शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील 1 ते 7 पर्यंतचे सर्व वर्ग सुरू करण्यास सरकारनं मान्यता दिली आहे. परिणामी आता गत पावणेदोन वर्षांपासून बंद असणारा शाळांचा परिसर गजबजणार आहे.

ग्रामीण आणि शहरी भागांसाठी याअगोदर वेगवेगळे नियम जाहीर करण्यात आले होते. ग्रामीण भागातील 5वी ते 12 वीचे वर्ग आधीच सुरू होते. तर शहरातील 7 वी ते 12 वी पर्यतचे वर्ग सुरू होते. आता सरकारनं सर्व शाळा पुर्णपणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रभाव अजूनही कमी झाला नसल्यानं कोरोना नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना याबाबत सुचना जारी करण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानं राज्यातील पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

थोडक्यात बातम्या 

या वर्षी 180 टक्क्यांनी वाढला टाटांचा ‘हा’ शेअर, झुनझुनवालांचीही आहे गुंतवणूक

रहमानच्या मुलीच्या आवाजातही आहे जादू, पाहा दुबईतला खास व्हिडीओ

“विराट कोहलीला कायमचा डच्चू, रोहित नव्हे ‘या’ खेळाडूला करणार पूर्णवेळ कर्णधार”

आत्ताची सर्वात मोठी बातमी- परमबीर सिंह पुन्हा पदभार स्वीकारणार?

पोलिसांनी सुरु केलीय वसुली?, आमदारानं पोस्ट केला धक्कादायक व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More