Top News कोरोना पुणे महाराष्ट्र

आता कोरोनाचं निदान होणार फक्त 10 सेकंदात; मराठमोळ्या शास्त्रज्ञाने विकसित केलं यंत्र

पुणे | कोरोनाचा फैलाव सर्वत्र वेगाने होत असल्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येतही वाढ होत आहे. कोरोनाचं निदान आता केवळ 10 सेकंदात होणार आहे. हे यंत्र मराठमोळ्या शास्त्रज्ञानी विकसित केलं आहे.

अमेरिकेत स्थित असलेले पुण्याचे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्रा. पी. व्ही. पानट यांचे चिरंजीव डॉ. राहूल पानट यांच्या नेतृत्वात आंतराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या मदतीने हे यंत्र विकसित केलं आहे. हे यंत्र मोबाईलच्या आकाराचं आहे. व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी त्या व्यक्तीच्या रक्ताचा थेंब इलेक्ट्रोडवर टाकण्यात येतो. रक्तातील अँटीजनशी अभिक्रीया झाल्यावर विशिष्ट प्रकारचे सिंग्नल मिळतात. हे सिग्नल मोबाईलवरही पाहता येणार असल्याचं कळतंय.

त्रिमीतीय छपाई तंत्रज्ञान आधारित सेन्सरवर आम्ही अनेक वर्षांपासून काम करत आहोत. या तंत्रज्ञानाच्या आधारे विकसीत केलेले सेन्सर कोरोनाच्या जलद आणि स्वस्त निदनासाठी उपयोगात येणार आहे. खऱ्या अर्थाने आमच्या तंत्रज्ञानाचा सर्वसामान्यांना फायदा होणार असल्याचं राहूल पानट यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, हे यंत्र सर्वात जलद कोरोनाचं निदान करणारं आहे. तसेच या यंत्राद्वारे भविष्यात इतर कोणत्याही संसर्गजन्य रोगाचं निदान करणं शक्य आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘…तर नक्कीच काहीतरी गडबड आहे’; संजय राऊतांचं मोदींवर टीकास्त्र

“एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा”

‘तुकाराम मुंढेंची पुन्हा नागपूरात बदली करा’; शिवसेनेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

सनी लिओनीचा कंगणा राणावतला टोला, म्हणाली…

मी भांडण सुरु करत नाही, संपवते- कंगणा राणावत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या