‘आता स्वप्न पूर्ण झालं’, अश्विनी महांगडेच्या ‘त्या’ पोस्टची होतेय जोरदार चर्चा

मुंबई | ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत राणु अक्काची भूमिका साकारत अभिनेत्री अश्विनी महांगडे(Ashwini Mahangade घराघरात पोहचली. आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं तिनं सर्वांची मनं जिंकली आहेत.

सध्या अश्विनी ‘आई कुठे काय करते'(Aai Kuthe Kai Karte) या मालिकेत अनघाची भूमिका साकारत आहे. अनघाच्या भूमिकेलाही प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अश्विनी आता लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली आहे.

नुकतीच अश्विनीनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टचं कारण असं की अश्विनीनं नवीन कार खरेदी केली आहे. त्यामुळं ती खूपच आनंदी दिसत आहे.

या पोस्टमध्ये तिनं नवीन गाडीसोबत फोटो शेअर केले आहेत आणि या फोटोंना कॅप्शन दिलं आहे की, खरी मेहनत नेहमीच चांगलं फळ देते, स्व कष्टाचा फळ, नानांचा आशिर्वाद, स्पप्न पूर्ण झालं.

दरम्यान, अश्निनीनं महिंद्राची XUV 300 कार खरेदी केली आहे. तिनं नवीन कार खरेदी केल्यानं चाहत्यांचा तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या-