बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आता राष्ट्रवादीवाले बाॅलिवूडची पण भांडी घासायला लागलेत”

मुंबई | राज्यातील राजकारणात सध्या ड्रग्ज प्रकरणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. देशातील सर्वात मोठी ड्रग्जची खेप मुंद्रा पोर्टवर पकडल्यानंतर काही दिवसातच एनसीबीने एका क्रूझवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मोठी मोठी नावं समोर येत आहेत. बाॅलीवूडचा कलाकार शाहरूख खानचा मुलगा या ड्रग्ज पार्टीत सापडल्यानं राज्यभर खळबळ उडाली होती. आता भाजपचे नेते निलेश राणे आणि राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांच्यामध्ये या प्रकरणावरून चांगलच शाब्दिक युद्ध रंगलं आहे.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. या प्रकरणात भाजपच्या नेत्यांचा हात असल्याचे नवाब मलिक म्हणाले होते. यावर उत्तर देताना माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. नवाब मलिक महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत याची खंत वाटते, असं निलेश राणे म्हणाले आहेत.

माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. जो ड्रग्सला समर्थन करतोय आणि ज्या अधिकाऱ्यांनी ट्रॅप लावून एक रॅकेट उधवस्त केलं त्यांच्यावर संशय घेतोय. आता राष्ट्रवादीवाले बॉलीवूडची पण भांडी घासायला लागले. काही महिन्यापूर्वी मलिकचा जावई ड्रग्समध्ये पकडला गेला होता, अशी खरमरीत टीका निलेश राणे यांनी केली आहे.

दरम्यान, एनसीबीच्या कारवाईच्या वेळी तिथे भाजपच्या नेत्यांच्या उपस्थितीने या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे. राष्ट्रावादी काॅंग्रेस आणि भाजप पुन्हा या निमित्ताने समोरासमोर उभं ठाकले आहेत. निेलेश राणे यांच्या या जहरी टीकेला राष्ट्रवादी काय उत्तर देत ते पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

पाहा ट्विट –

थोडक्यात बातम्या 

पर्यावरणासाठी एक पाऊल! ‘वन्यजीव सप्ताह’ अंधारबन जंगलमध्ये साजरा

राजस्थानसमोर कोलकाताचं आव्हान! प्लेऑफसाठी राजस्थानच्या हातात मुंबईचं भवितव्य

आयकर धाडीनंतर सोमय्या म्हणतात, पवार साहेब जरंडेश्र्वरचा खरा मालक कोण?

शालूकडून नवरात्रीच्या हार्दीक शुभेच्छा, पाहा राजेश्वरी खरातचा गोजीरवाणा अंदाज

आता देवीच्या मंडपात फक्त 5 जणांनाच परवानगी, वाचा सविस्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More