मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मसुरी येथे आयएएस अकॅडमीच्या समारोपाला जाणार होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारल्याचं समोर आलं.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विमान प्रवासाला परवानगी नाकारल्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.
यावरून भाजप नेते आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी यावरून ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांना विमानातून उतरवलंय, आता महाराष्ट्रातील जनता या तिन्ही पक्षांची घमेंड उतरवेल. राज्य सरकारने आता राज्यपालांचे हीन दर्जाने अपमान करू असं धोरण स्वीकारलंय, असं म्हणत आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय
दरम्यान, महाराष्ट्राच्या इतिहासातलं इगो असलेलं सरकार मी पाहिलं नव्हतं, आपण कुणाचा अपमान करतोय, हे कळालं पाहिजे, राज्यपाल संविधानिक पद आहे, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.
थोडक्यात बातम्या-
ठाकरे सरकार-राज्यपालांमध्ये वादाची ठिणगी?; कारण ठरलं विमान
…तर ते लोक देशविरोधी; सचिनला ट्रोल करणाऱ्यांविरोधात नवनीत राणा भडकल्या!
धक्कादायक! चार दिवस दारु पाजून महिलेवर सामूहिक बलात्कार
अबब… तब्बल 55 वर्षांपासून ‘या’ गावात एकाच घरातील माणूस होतोय सरपंच
अनुदान कमी होतंय, पेट्रोलप्रमाणे गॅससाठीही अतिरिक्त पैसे मोजावे लागणार!
Comments are closed.