आता पुरुषांसाठी कंडोमला पर्याय मिळाला!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | नको असलेली गर्भधारणा थांबवण्यासाठी पुरुष कंडोमचा(Condom) वापर करतात. आजही आपल्याकडं कंडोम जास्त वापरलं जात नाही. कंडोमचा पर्याय अनेकांना आवडत नसल्यानं महिलांना अनेकदा गर्भनिरोधकाच्या गोळ्या घ्याव्या लागतात. आता मात्र त्याला एक पर्याय उपलब्ध झाला आहे.

अनेक दिवसांपासून या गोष्टीवर तज्ज्ञांचा अभ्यास सुरु होता. त्यांना आता यश मिळालं आहे. महिलाच्या गर्भनिरोधक गोळ्याप्रमाणं (Contraceptive pills) शास्त्रज्ञ पुरुषांसाठी गोळ्या बनवण्याचा प्रयत्न करत होते. या प्रयत्नात त्यांना यश मिळालं असून आता पुरुषाच्या गोळ्या बाजारात लवकरच येण्याची शक्यता आहे.

आता कंडोमला पर्याय म्हणून पुरुषांसाठी गोळी बनवण्यात आल्याचं शास्त्राज्ञांनी सांगितलं आहे. युनायटेड स्टेट्समधील (United State) अनेक शास्त्रज्ञ आणि संशोधक सध्या यासंदर्भात तपास करत आहेत. यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने(National Institutes of Health) पुरस्कृत अभ्यासातून असे दिसून आलं आहे की या गोळीचा एक डोस लैंगिक संबंधापूर्वी घेतल्यास स्पर्मचा वेग थांबू शकतो.

यामुळे तुमच्या पार्टनरल गर्भधारणा होत नाही. कंडोम आणि महिलांच्या गर्भनिरोधक गोळ्या याला पर्याय म्हणून या गोळ्याचा विचार होऊ शकतो. या गोळ्यांमुळे स्पर्मची(sperm) गतिशीलता काही प्रमाणात थांबते ज्यामुळं ओव्यूलेटेड Eggs कडे वाहून जाऊ शकत नाही.

शास्त्रज्ञांच्यामते गर्भनिरोधक गोळ्यांच्या प्रभावाच्या एका तासात शुक्राणूंची गतिशीलता मंदावलेली असते. यागोळ्यांचे दुष्परिणाम नगण्य आहेत. या गोळ्या हार्मोन्ससह (hormones) संपर्कात येत नाहीत. दरम्यान, यामुळे महिलांचं गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचं प्रमाण आणि त्याचे होणारे परिणाम कमी होतील.

महत्त्वाच्या बातम्या