बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- नवाब मलिक

गोंदिया | पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीच्या कलावरून सध्या तृणमूल काँग्रेस आपली सत्ता कायम राखणार असल्याचं चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. गोंदियामध्ये ते बोलत होते.

देशात कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झालीय त्याची जबाबदारी घेऊन नरेंद्र मोदी आणि मंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. मात्र, त्यावर अमित शहा यांनी जेव्हा जनता आम्हाला नाकारेल तेव्हाच आम्ही राजीनामा देऊ, असं म्हटलं होतं. तेव्हा आता बंगालच्या जनतेने त्यांचा राजीनामा मागितला आहे. त्यामुळे अमित शहा आणि मोदी यांनी राजीनामा द्यावा, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये गेल्या तीन वर्षांपासून आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अबकी बार 200 आकडे पार अस बोलून फेकाफेकीचे राजकारण केलं. आता निवडणुकीच्या निकालाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, असंही नवाब मलिक म्हणाले.

दरम्यान,| पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक मोठ्या धामधुमीत पार पडल्यानंतर आता निकाल जवळजवळ स्पष्ट झाले आहेत. येथे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने एकहाती विजय मिळवला आहे. मात्र नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाची लढाई ममता बॅनर्जी हारल्या आहेत.

थोडक्यात बातम्या- 

“राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना दुसऱ्यांच्या लग्नात नाचायची सवय आहे”

“अवताडेंचा विजय आघाडी सरकारच्या थोबाडीत मारल्यासारखा, फडणवीस जे बोलतात ते करुन दाखवतात”

कसा झाला समाधान आवताडे यांचा विजय?, पाहा कशी कशी मिळाली मतं

“संज्या, तू स्वत: कधी निवडून येणार ते आधी सांग”

“तुम्ही फक्त जामिनावर सुटलात, जोरात बोलू नका नाहीतर महागात पडेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More