बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जळगावात रंगणार ‘खडसे विरूद्ध खडसे’ सामना; भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता

जळगाव | महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर आता जिल्हा बॅंकेच्या निवडणुका होणार आहे. भाजपकडून खासदार रक्षा खडसे आगामी जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत उतरणार आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाने भाजपसोबत जाण्यास नकार दिल्यामुळे ही निवडणूक भाजप स्वतंत्र लढणार आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते एकनाथ खडसे विरूद्ध रक्षा खडसे अशी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत अधिकच चुरस रंगणार असल्याचं चित्र सध्या दिसत आहे.

जळगाव जिल्हा बॅंकेच्या संचालक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल निश्चित करण्यात आले होते, परंतु काॅंग्रेस पक्षाने भाजपसोबत जाण्यास पॅनल करण्यात नकार दिला असल्याचं भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. या निर्णयामुळे याठिकाणी एकनाथ खडसे विरूद्ध रक्षा खडसे असा सामना रंगण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काॅंग्रेसदेखील स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे आता सगळ्याचं लक्ष लागून आहे.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी अंजिठा विश्रामगृहावर 16 ऑक्टोबर रोजी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजप नेते गिरीश महाजन उपस्थित होते.

दरम्यान, अंजिठा विश्रामगृहावर पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि माजी आमदार सतीष पाटील, काॅंग्रेसचे आमदार शिरीष चौधरी, शिवसेनेच आमदार किशोर पाटील आदी नेते देखील उपस्थित होते. काॅंग्रेस नेत्यांनी ही निवडणूक आघाडी म्हणून लढण्यासाठी भूमिका मांडली होती.

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! तब्बल 18 महिन्यानंतर मुंबईत एकही कोरोना मृत्यू नाही; पाहा आजची आकडेवारी

केरळमध्ये पावसाचा हाहाकार! भूस्खलनात शेकडो नागरिक दबल्याची भीती तर 26 जणांचा मृत्यू

T-20 वर्ल्ड कपला धमाकेदार सुरूवात; ‘या’ देशाने पहिला सामना 10 गडी राखून जिंकला

“भाजपने बेईमानी केली नसती तर उद्धवसाहेब देखील बेईमान झाले नसते”

‘आठवण करून देतोय, बाप बाप असतो!’; रामदास कदमांच्या बॅनरबाजीने सर्वांच्या भुवया उंचावल्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More