आता ‘या’ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत मिळालेले पैसे परत करावे लागणार
नवी दिल्ली | केंद्र सरकार(Central Goverment) देशातील गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी ‘पीएम किसान सन्मान निधी योजना'(PM Kisan Yojana) राबवत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रूपये दिले जातात. ही रक्कम तीन हफ्त्यांमध्ये दिली जाते.
या योजनेचा देशातील करोडो शेतकरी लाभ घेत आहेत. या योजनेचा फायदा घेण्यासाठी काही नियम ठरविण्यात आले आहेत. परंतु काही शेतकरी या नियमांत बसत नसतानाही या योजनेचा फायदा घेत असल्याचं लक्षात आलं आहे.
देशातील कोणत्याही व्यक्तीचे जर उत्पन्न जास्त असेल आणि तो व्यक्ती कर भरण्यास पात्र ठरत असेल तर त्याला कर भरावाच लागतो. हा नियम शेतकऱ्यांनाही लागू आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा नियम असा आहे की, जे शेतकरी कर भरण्यास पात्र आहेत, त्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा घेता येणार नाही.
परंतु काही शेतकऱ्यांनी आयकर भरल्यानंतरही या योजनेचा फायदा घेतला आहे, असं दिसून आलं आहे. त्यामुळं पात्र नसलेल्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान योजनेचा निधी जमा झाला आहे, त्यांना आता ही रक्कम परत करावी लागणार आहे.
दरम्यान, ज्या शेतकऱ्यांकडं दोन हेक्टरपर्यंत जमीन आहे, त्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.