आता ‘या’ भाजप नेत्यानेच मोदींची तुलना केली रावणाशी

मुंबई | पंढरपूरमध्ये आहिल्याबाई होळकर आणि बायजाबाई शिंदे यांनी बांधलेली राम आणि कृष्ण ही दोन मंदिरे पंढरपूर काॅरिडाॅर प्रकल्पामुळं तोडली जाणार असल्याच्या चर्चा आहेत. आता यावरून भाजपचे(BJP) नेते सुब्रमण्यम स्वामी(Subramanian Swamy) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi)निशाणा साधला आहे.

मंदिरे पाडली जाण्याच्या मुद्द्यावरून सुब्रमण्यम स्वामी यांनी शनिवारी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी मोदींची तुलना रावणाशी केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.

ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, मोदी रावणासारखेच धार्मिक असल्याचा दावा करत आहेत. असा दावा करत ते मंदिरे पाडण्याचं आणि त्यावर ताबा मिळवण्याचं काम करत आहेत.

उत्तराखंड आणि वारणसीमध्येही हेच झालं. आता मोदी देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीनं पंढरपूरातील पवित्र स्थळांना नष्ट करण्याची योजना आखत आहेत. ही कत्तल रोखण्यासाठी मी लवकरच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार आहे, असंही त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.

स्वामी यांनी मोदींची तुलना रावणाशी केल्यानं आणि याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार असं सांगितल्यानं भाजप पक्षामध्ये नवीन वाद पेटू शकतो, अशा चर्चांणा आता उधाण आलं आहे.

दरम्यान, यापूर्वी काॅंग्रेसचे(Congress) अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे(Mallikarjun Kharge) यांनीही गुजरातमध्ये जाहीर सभेत बोलताना मोदींची तुलना रावणाशी केली होती. यानंतर भाजपनं हा गुजरात आणि गुजराती लोकांचा अपमान असल्याचं म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या-