बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अमित शहा यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा’; काँग्रेसची मोठी मागणी

मुंबई | महाराष्ट्राचं राजकारण सध्या तापलेलं पहायला मिळत आहे. जनआशीर्वाद यात्रेनं पेटलेलं राजकारण आता सीबीआयपर्यंत पोहचलं आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपामुंळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. त्यावर आता काॅंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाष्य केलंय.

सीबीआयनं आपल्या प्राथमिक तपासात अनिल देशमुख हे दोषी नसल्याचं म्हटलं होतं. यावरून आता राज्यातील नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली. सीबीआयच्या तपासात अनिल देशमुख हे निर्दोष आहेत, मग त्यांच्यावर आरोप लावून सीबीआयला कामाला कोणी लावलं?, हा सवाल सचिन सावंत यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. केंद्र सरकार आपल्या अधिकारांचा गैरवापर करून तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारला धोका पोहचवण्याचं काम करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात पुरावे नसताना सुद्धा दबाव तंत्राचा वापर करून एफआरआय नोंदवण्यात आला. एफआरआय कोणाच्या सांगण्यावरून नोंदवला गेला ते स्पष्ट करावं आणि यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असंही सचिन सावंत म्हणाले आहेत.

दरम्यान, सचिन वाझे प्रकरणात अनिल देशमुखांना गोवण्यात आलं. उच्च न्यायालयाने प्राथमिक तपास करण्याचे निर्देश दिले होते, त्यावर सीबीआयने अनिल देशमुख यांच्या संबंधी कसलेही पुरावे नसल्याचं म्हटलं होतं. असंही सचिन सावंत यावेळी म्हणालं आहेत.

थोडक्यात बातम्या 

‘शेतकऱ्यांची डोकी फोडून तुम्हाला जनआशीर्वाद मिळणार का?’; शिवसेनेचा संतप्त सवाल

अवनीची ऐतिहासिक कामिगरी! अवनी लेखराने पटकावलं सुवर्णपदक

अमेरिकेचा एअर स्ट्राईक! ड्रोन राॅकेटचा वापर करून आयसीसचा मोठा डाव उधळला

“मी तुमच्या सरकारला घाबरत नाही, सरकारनं शेतकऱ्यांची माफी मागावी”

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More