बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता नवा वसुली मंत्री कोण? अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ कडाडल्या

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या ‘लेटर बॉम्ब’नंतर अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला आहे. सचिन वाझेंना गृहमंत्र्यांनी महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. त्याबाबत अॅड. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयानं ‘सीबीआय’ चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर अनिल देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी अखेर राजीनामा दिला. पण आता प्रश्न उरतो की, नवा वसूली मंत्री कोण? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच एखादा चेहरा बदलल्याने महाविकासआघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू बदलणार नाही, अशी टीकाही चित्रा वाघ यांनी केली.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या ‘लेटर बॉम्ब’नंतर राज्याच्या राजकारणात उठलेलं वादळ अद्याप शमलेलं नाही. या प्रकरणात अॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान या प्रकरणाचा तपास CBI मार्फत करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान, अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी गंभीर आरोप केलाय. राजीनामा दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शासकीय निवासस्थान आणि कार्यालयात असलेले 100 कोटीच्या प्रकरणाचे पुरावे नष्ट करण्याचं काम सुरु असल्याचं भातखळकर यांनी म्हटलंय. इतकच नाही तर CBI ने याबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या – 

शरद पवार आपल्या खास मर्जीतील ‘या’ नेत्याकडे सोपवणार गृहमंत्रिपद?

मोठी बातमी! अखेर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

तरुणींनी बाल्कनीत दिले न्यूड पोज, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडुन ‘ही’ कारवाई, पाहा व्हिडीओ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल खेळाडूंसाठी बीसीसीआयचा मोठा निर्णय; राबवणार ‘ही’ मोहिम

फेक फिल्डिंगमुळे पाकिस्तानचा फखर जमान द्विशतकाच्या तोंडावर आऊट, मुंबई इंडियन्ससच्या खेळाडूला शिक्षा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More