बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आता कुणाला काय सीडी लावायची, ती लावावी’; भाजपचं थेट खडसेंना आव्हान

मुंबई | दोन दिवसांपुर्वी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अटक केली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी 13 तास कसून चौकशी केल्यानंर गिरीश चौधरींना रात्री अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता एकनाथ खडसे यांना देखील बुधवारी ईडीची नोटीस आली आहे. त्यानंतर आता राज्याचं वातावरण तापताना दिसत आहे.

काही दिवसांपुर्वी एकनाथ खडसे यांनी  भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना ईडीची नोटीस आली होती. माझ्यामागे सीडी लावाल तर आम्ही सीडी लावू, असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं होतं. त्यानंतर आता बुधवारी त्यांना पुन्हा ईडीची नोटीस आली आहे. त्यांना ईडीची नोटीस आल्यानंतर आता भाजपने एकनाथ खडसे यांना थेट आव्हान दिलं आहे.

आता कुणाला काय सीडी लावायची, ती लावावी, असं आव्हान भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी एकनाथ खडसे यांना केलं आहे. तर भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी आताच्या सत्ताधाऱ्यांनीच सुरु केली होती. त्यामुळे ईडी आता याप्रकरणाचा तपास करत आहे. मुळात कर नाही त्याला डर कशाला?, अशी टीका देखील अतुल भातखळकर यांनी केली आहे.

दरम्यान, आज सकाळी 11 वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश खडसेंना देण्यात आले आहेत. परंतू बुधवारी अचानक एकनाथ खडसे यांची तब्येत बिघडली असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे त्यांनी आजची पत्रकार परिषद देखील रद्द केली आहे.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी, वाचा एका क्लिकवर

पीयूष गोयल यांच्याकडून रेल्वे मंत्रालय काढलं, या मंत्र्याची रेल्वेमंत्रिपदी वर्णी

“मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा आभारी”

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप जाहीर; वाचा कोणाला कोणतं मंत्रिपद?

दिलासादायक! पुण्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल, वाचा आजची आकडेवारी!

सहकार क्षेत्रासाठी मोदी सरकारचं मोठं क्रांतिकारी पाऊल; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More