बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हिवाळी अधिवेशन: “…आता स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का?” अजित पवार संतापले

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackrey) यांच्यावर नुकतीचं मणक्याची शस्त्रक्रिया पार पडली आहे. डॉक्टरांनी त्यांना पुढील काही दिवस आराम करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून ते घरूनच काम करत आहेत. मात्र, आता हिवाळी अधिवेशनाला मुख्यमंत्री उपस्थित राहाणार का?, असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. मात्र, यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना भन्नाट असं उत्तर दिलं आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अजित पवारांनी पत्रकारांशी सवांद साधला. यावेळी त्यांना पत्रकारांनी वारंवार “मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थित राहणार का?” असा प्रश्न विचारला. यावर अजित पवारांनी शेवटी पत्रकारांना आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे. “मुख्यमंत्री अधिवेशनाला येणार आहेत, हे आता स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का?,असं संतापून पवार म्हणाले.

आजपासून राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणे चहापानाचा कार्यक्रमात घेण्यात येतो. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे कार्यक्रमाला उपस्थिती लावली असल्याचं यावेळी अजित पवारांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे यंदाचं अधिवेशन हे मुंबई घेण्यात येत आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली होती. याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या मानेला त्रास होऊ नये यासाठी रस्तेेदेखील साफ करण्यात आले आहेत. वर्षा बंगला ते विधान भवन मार्गावरील काही किलोमीटर पर्यंतचा रस्ता स्वच्छ करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

हिवाळी अधिवेशन: मुख्यमंत्र्यांच्या मानेला त्रास नको म्हणून प्रशासन लागलं कामाला, केली ‘ही’ जोरदार तयारी

हिवाळी अधिवेशनापूर्वी नाना पटोले थेट दिल्लीत, राजकीय हालचालींना वेग

गुंतवणुकदारांना दिलासा; LIC IPO बाबत मोदी सरकारकडून महत्वाची अपडेट

‘नाद नाय करायचा राजेंचा’ भर कार्यक्रमात पुन्हा एकदा कॉलर उडवत केला डान्स

MPSC Exam: इच्छुकांसाठी सुवर्णसंधी; राज्य सरकारमध्ये तब्बल ‘इतक्या’ पदांसाठी मेगाभरती सुरू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More