नवी दिल्ली | शिक्षण आणि नोकरीनिमित्त काही व्यक्ती आपल्या गावापासून दूर असतात. अशावेळी त्यांना मतदान करण्यापासून वंचित राहावं लागतं. परंतू आता तुम्ही कुठेही असाल तरी तुमच्या उमेदवाराला मतदान करू शकता अशी सोय उपलब्ध करुन देण्यासाठी भारतीय निवडणूक विभाग प्रयत्न करत आहे.
चेन्नई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या मदतीने ब्लॉक चेन प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. त्याद्वारे शहराबाहेरील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी याच नव्या संकल्पनेची माहिती दिली आहे.
विकसित करण्यात येत असलेली ब्लॉक चेन प्रणाली माझ्या कारकिर्दीतच पूर्ण होईल, असा विश्वास मुख्य निवडणूक आयुक्त सुनील आरोरा यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
दरम्यान, भारतामध्ये एकूण 450 दशलक्ष मतदार आहेत, जे विविध कारणावरुन रहिवासी असलेल्या शहराबाहेर तात्पुरत्या स्वरुपासाठी स्थायिक आहेत. त्यामुळे अशा अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागतं.
ट्रेंडिंग बातम्या-
शरद पवारांचं गृहमंत्र्यांना पत्र; पोलिसांसाठी केली ‘ही’ मागणी
वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदूरीकर महाराजांना पहिला झटका!
महत्वाच्या बातम्या-
“मला असं वाटतंय की मी एका देवाची मुलगी आहे”
…म्हणून आमचा दिल्लीत पराभव झाला; अमित शहांनी सांगितलं खरं कारण
Comments are closed.