बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता तुम्हाला नेटवर्क प्रॅाब्लेम येणार नाही, जिओनं उचललं सर्वात मोठं पाऊल!

मुंबई | काही वर्षांपुर्वी जिओनं टेलीकाॅम क्षेत्रात क्रांती केली. सर्वांना फुकट इंटरनेट देत टेलीकाॅम क्षेत्रात पाऊल टाकलं, त्याचबरोबर त्यांनी काही दिवस या क्षेत्रात एकाधिकारशाही देखील तयार केली होती. आता लाॅकडाऊनमुळे इंटरनेटची गरज वाढल्यानं आता जिओनं एक मोठा निर्णय घेतला आहे. रिलायन्स जिओ भारतातील डेटाच्या वाढत्या मागणीला समर्थन देण्यासाठी नेक्स्ट जनरेशनच्या दोन केबल बसवणार आहे.

हा प्रकल्प अनेक जागतिक कंपन्यांच्या भागीदारीने पूर्ण होईल आणि केबल पुरवठ्यासाठी जगभरातील नावाजलेल्या कंपन्या आणि सबकॉमबरोबर करारही करण्यात आला असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. त्यामुळे आता जिओची नेटवर्क कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला नेटवर्क प्रॅाब्लेम येणार नाही.

कंपनी आयएएक्स आणि आयईएक्स ग्राहक आणि वापरकर्त्यांसाठी भारतात आणि बाहेरील तसेच क्लाऊड सर्व्हिसेज डेटा प्रवेश करण्याची क्षमता वाढणार असल्याचं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. फायबर ऑप्टिक सबमरीन टेलिकॉमच्या इतिहासात प्रथमच या प्रणालीमुळे भारताचा आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा नकाशा समोर आला आहे.

“डिजिटल सेवा आणि डेटा वापरात भारताच्या वाढीमध्ये जिओ आघाडीवर आहे. जागतिक साथीच्या वेळी या गंभीर यंत्रणेची अंमलबजावणी करणं एक आव्हान आहे, परंतु कोरोना महामारीमुळे उपक्रम आणि ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी डिजिटल परिवर्तन आणि उच्च-कार्यक्षम जागतिक कनेक्टिव्हिटीची गरजच तीव्र झाली आहे”, असं जिओचे अध्यक्ष मॅथ्यू ओमरन म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

लॉकडाऊनमध्ये घरातच पोल डान्स करायला गेली महिला अन्…; पाहा हास्यास्पद व्हिडिओ

आता 15 मिनिटात कोरोना रिपोर्ट; ‘या’ कंपनीनं तयार केली 100 रूपयांची कोरोना चाचणी किट

पुण्याच्या विभागीय आयुक्तांना दुसऱ्यांदा झाली कोरोनाची लागण; मागच्या आठवड्यातच घेतली होती लस

दिलासादायक! मुंबईची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; कोरोनामुक्तीचा दर पोहोचला 93 टक्यांवर

“कोणतीच व्हॅक्सिन शंभर टक्के संरक्षण करू शकत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More