बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आता डबल इंजिनचं सरकार आहे, त्यामुळे…’; गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य

जळगाव | राज्यात नुकताच मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. त्यात शिंदे गट आणि भाजप(BJP) यांच्यातील काही नेते मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अशातच गिरीश महाजन(Girish Mahajan) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जळगाव(Jalgaon) येथे माध्यमांशी संवाद साधला, आणि अनेक राजकीय  मुद्द्यांवर ते स्पष्ट बोलले.

महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) आणि मी  ओबीसी(OBC) आहोत. त्यामुळे सरकारने मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसींवर अन्याय केला, हा एकनाथ खडसेंचा आरोप चुकीचा आहे. तुम्ही सगळे म्हणजेच संपुर्ण ओबीसी नाही. त्यामुळे आपण थोड शांत रहा. तू तू मै मै करू नका,असं म्हणत महाजन यांनी खडसेंना सुनावलं.

गेल्या अडीच वर्षात राज्याचा विकास खुंटला आहे. ते आता भरून काढण्याचे आमच्यासमोर मोठे अवाहन आहे. आता डबल इंजिनच सरकार आहे. राज्यात रखडलेला विकास मार्गी लागेल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघंही दमदार नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला राज्याला पुढं न्यायचं आहे, असंही गिरिश महाजन पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.

तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबद्दलही त्यांनी पत्रकारांची उत्तरे दिली. पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही. याबद्दल विचारले असता, पंकजा मुंडे नाराज आहेत, असं मला वाटत नाही. पक्षश्रेष्ठी त्यांच्याबद्दल विचार करतील, त्यांना मोठम पद मिळेल, असं महाजन म्हणाले. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी असतेच, एका पक्षाचं सरकार असलं तरीही नाराजी असतेच, असंही महाजन म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘…असलं काही बोलून, पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा कमी करू नका’; राहुल गांधी मोदींवर बरसले

कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून गुडन्यूज, इतके पैसे होणार खात्यात जमा

ईडीच्या रडारवर असलेल्या भानवा गवळींनी बांधली मोदींना राखी

आरोप करणाऱ्यांना संजय राठोडांचा गंभीर इशारा, म्हणाले…

वरूण गांधीचा पंतप्रधान मोदींना घरचा आहेर, ‘या’ मुद्द्यावरून घेतला खरपूस समाचार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More