अखेरपर्यंत ICU बेड मिळालाच नाही; NSG ग्रूप कमांडरचा रस्त्यातच मृत्यू
नवी दिल्ली | कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स, कोरोना लसींचा मोठा तुडवटा जाणवू लागला आहे. ऑक्सिजनअभावी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशात ब्लॅक कॅट कमांडो म्हणजेच NSGच्या ग्रूप कमांडरचा देखील वेळेवर बेड न मिळाल्याने मृत्यू झाला आहे.
NSG ग्रूप कमांडर बिरेंद्र कुमार झा यांना दिल्लीत आयसीयू बेड मिळाला नाही. बिरेंद्र कुमार 22 एप्रिल रोजी अर्धसैनिक दलाच्या रेफरल हॉस्पीटलमध्ये कोरोनाची लागण झाल्यामुळे दाखल झाले होते. त्यावेळी त्यांची परिस्थिती ठीक होती. पण 4 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता अचानक वीरेंद्र कुमार झा यांची तब्येत बिघडली
नोएडाच्या रेफरल हॉस्पीटलमध्ये आयसीयू बेड उपलब्ध नसल्यामुळे तात्काळ दुसऱ्या हॉस्पीटलमध्ये हलविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दिल्लीतील अनेक हॉस्पीटल्समध्ये संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना बेड मिळाला नाही.
अनेक ठिकाणी चौकशी केल्यानंतर देखील अखेरपर्यंत वीरेंद्र कुमार झा यांना बेड मिळाला नाही. नंतर प्रकृती इतकी बिघडली की रुग्णालयापर्यंत पोहोचण्याआधीच बिरेंद्र झा यांचा मृत्यू झाला.
Sh Birendra Kumar Jha,Group Cdr,NSG (BSF 1993) passed away Today on 05th May at Noida battling Covid. pic.twitter.com/HZnx2Lk5VT
— National Security Guard (@nsgblackcats) May 5, 2021
थोडक्यात बातम्या-
“नव्या संसदेसाठी, पुतळ्यांसाठी 20 हजार कोटी आहेत मग लसीकरणाला 30 हजार कोटी का नाहीत?”
‘किमान कोरोना काळात तरी….’; सर्वसामान्यांसाठी सुप्रिया सुळेंनी मोदींकडे केली ‘ही’ मागणी
औषधांचा काळाबाजार करणार्यांना भर रस्त्यात चोपलं पाहिजे- रितेश देशमुख
चिंताजनक! कोरोनावर मात केल्यानंतर रुग्णांना होतंय ‘हे’ गंभीर इन्फेक्शन
ऑनलाईन संवाद साधताना लॉकडाऊन शब्दच विसरले मुख्यमंत्री, व्हिडीओ व्हायरल
Comments are closed.