NSSO ने मोदी सरकारचा बुरखा फाडला! 5 वर्षात 2 कोटी पुरूष बेरोजगार झाले….

नवी दिल्ली | बेरोजगारीच्या आकड्यांमुळे मोदी सरकार अडचणीत येणार असल्याचं NSSO (नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस) च्या रिपोर्टमधून समोर येत आहे.

पाच वर्षात जवळपास पाच कोटी पुरूष बेरोजगार झाले आहेत. याबाबत ‘इंडियन एक्सप्रेस’ या इंग्रजी दैनिकाने माहिती दिली आहे. मोदी सरकारने दरवर्षी कोट्यवधी युवकांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं.

NSSO ने केलेला सर्व्हे सरकार जाणून-बुजून प्रकाशित करत नसल्याचा आरोप केला जात आहे. NSSO ने केलेल्या सर्व्हेनुसार पुरूष कामगारांची संख्या 28 कोटी 60 लाख एवढी घसरली आहे. जी 2011-12 मध्ये 30 कोटी 40 लाख इतकी होती.

दरम्यान , एकूण 4 कोटी 70 लाख रोजगार कमी झाला असून NSSOच्या रिपोर्टमध्ये शहरी आणि ग्रामीण भागाची वेगवेगळी आकडेवारीही देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादी भाजपला म्हणते, आपला पाळणा कधी हलणार की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार…?

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का?

-नवनीत राणा अमरावतीतून लढणार, स्वत: पवार प्रचाराला येणार

-तब्बल 26 वर्षानंतर अनिल अण्णा गोटे शरद पवारांच्या भेटीला!

-युती सोडणे योग्य नाही, राज्यातल्या सत्तेत आरपीआयला वाटा मिळणार- रामदास आठवले