Uddhav Thackeray | लोकसभा निवडणूक 2024 (Loksabha Election 2024) च्या पाचव्या टप्प्यातील प्रचार आज संपणार असून सोमवारी मतदान होणार आहे. शुक्रवारी मविआची रॅली झाल्यानंतर आज , शनिवारी सकाळी मुंबईत इंडिया आघाडीची पत्रकार परिषद शनिवारी झाली. या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका
आमच्याकडे चेहरा कोण हा प्रश्नच नाहीये, प्रश्न आहे तो भाजपचा, कारण त्यांच्याकडे एकच चेहरा आहे आणि तोही आता चालत नाहीये. भाजप काहीही म्हणू दे, भाजप आणि नरेंद्र मोदी म्हणजे ब्रह्मदेव नाहीत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी टीका केली.
लोकसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आहेत.अशा वेळेस इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यावर काही सहमती आहे का ? पुरेसं संख्याबळ बनलं तर राहुल गांधी हे या सरकारचं नेतृत्व करतील का, तुमची तशी इच्छा आहे का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं.
मोदी लाट आज कुठेही नाही- उद्धव ठाकरे
प्रत्येक वेळेला निवडणूक आली की हे बोहल्यावर चढतात. 2014 साली , 2019 साली आणि आता 2024 साली ते बोहल्यावर चढले. आणि आता त्यांचा चेहरा चालत नाही. मोदी लाट आज कुठेही नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपची पंचाईत अशी झाली आहे की, निवडणूक आता अंतिम टप्प्यात आल्यावर ते पंतप्रधान पदाचा चेहरा बदलू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे हरण्याशिवाय दुसरा पर्या नाही, असे म्हणत भाजपचा पराभव निश्चित आहे, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.
आमच्याकडे पंतप्रधानपदासाठी अनेक चेहरे आहेत, त्याबद्दल काय करायचं हे आमच्या बैठकीमध्ये ठरलं आहे. पहिले त्यांना अंगावर यायचं तेवढं येऊ द्या . त्यांच्याकडे आता चेहरा नाही. विरोधकांवर टीका करताना मोदी म्हणाले होते की एकच प्रॉडक्ट किती वेळा लाँच करायचं ? हाच सवाल आता त्यांना लागू होतो, असंही त्यांनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
गरोदरपणात महिलांचा आहार कसा असावा, जाणून घ्या ICMR ची मार्गदर्शक तत्त्वे
घराचं स्वप्न महागलं; ‘या’ प्रमुख शहरांमध्ये घराच्या किंमतीत वाढ
‘तारक मेहता…’ मधील सोढी अखेर घरी परतला; एवढ्या दिवस कुठे होता?, धक्कादायक खुलासा समोर
विराट कोहलीच्या चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर; ‘तो’ व्हिडिओ तूफान व्हायरल
जबरदस्त आणि आकर्षक टीव्हीएस कंपनीची ब्लॅक एडिशन लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत