बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयफोनमधून झाले तरुणीचे न्यूड फोटो सोशल मीडियावर लीक, अ‌ॅपल कंपनी देणार करोडोंची भरपाई

नवी दिल्ली | जगप्रसिद्ध मोबाईल बनवणारी कंपनी अॅपलमुळे एका तरुणीला बदनामीला सामोरं जावं लागलं आहे. संबंधित तरुणीचे न्यूड फोटो आयफोनमधून सोशल मीडियावर लीक झाले होते. यानंतर तरुणीने तक्रार केल्यावर आता आयफोन कंपनी तरुणीला करोडोंची भरपाई देणार आहे.

संबंधित तरुणीचं वय 21 वर्ष असून तिचं नाव गौपनीय ठेवण्यात आलं आहे. या मुलीचा फोन खराब झाल्याकारणाने तिने तिचा फोन आयफोन स्टोरमध्ये रिपेअरिंगसाठी दिला होता. यादरम्यान तिचे न्यूड छायाचित्र फेसबुकवर लिक झाले. याबाबत तिला कसलीच कल्पना नव्हती. मात्र तिच्या मित्र-मैत्रिणींनी तिला याबाबत विचारल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

न्यूड छायाचित्र लिक झाल्यानंतर संबंधित तरुणीने तक्रार नोंदवली असून तिची भरपाई रक्कम समोर आली नव्हती. मात्र तरुणीच्या वकिलांनी या घटनेमुळे झालेल्या त्रासासाठी कंपनीकडे 5 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 36,61,59,000 मागणी केली आहे.

दरम्यान,स्टोअरमध्ये तिचा मोबाईल रिपेयर करणाऱ्या व्यक्तीनं तरुणीच्या फेसबुक पेजवर न्यूड फोटो आणि एक व्हिडिओ पोस्ट केला होता. मात्र आता संबंधित स्टोअरवर कारवाई करत कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“…हे सत्य स्वीकारण्याची मानसिकता विरोधकांनी ठेवायला हवी”

‘…म्हणून इतक्यात पेरणी करू नका’; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला

‘2024 नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…’; भाजप नेत्याची बोचरी टीका

‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण…’; संजय राऊतांचा खुलासा

केंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More