देश

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5734 वर; 24 तासात 549 नवे रुग्ण

Loading...

नवी दिल्ली | देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 5734 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात 549 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यापैकी 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात कोरोनाने आतापर्यंत 166 जणांचा बळी घेतला आहे. तर 473 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने 2500 डॉक्टर्स आणि 35,000 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तैनात केलं आहे. कोरोना विरोधात लढण्यासाठी देशभरातील 586 हेल्थ युनिट टीम, 45 उपविभागीय हॉस्पिटल, 56 विभागीय हॉस्पिटल, 8 प्रोडक्शन युनिट हॉस्पिटल आणि 16 क्षेत्रिय हॉस्पिटल पूर्णपणे सज्ज झाले आहेत, असं लव अग्रवाल यांनी सांगितलं.

आतापर्यंत 1.7 कोटी पीपीईची ऑर्डर देण्यात आली आहे. त्याचबरोबर 49,000 व्हेंटिलिटर्सचीदेखील ऑर्डर दिली गेली आहे, असं देखील अग्रवाल यांनी सांगितली.

 

Loading...

 

ट्रेंडिंग बातम्या-

आमदारांच्या वेतनातील 30 टक्के कपातीला ठाकरे सरकारची मंजुरी

‘भीकेत मिळालेल्या आमदारकीचा वापर’; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

महत्वाच्या बातम्या-

उद्धवा महाराष्ट्र तुझ्या खांद्यावर उभा आहे बेटा- सिंधुताई सपकाळ

‘तुम्ही आम्हाला अडवलं का?’; औरंगाबादमध्ये दुचाकीस्वारांकडून पोलिसांना मारहाण

अनंत करमुसे मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच जणांना अटक

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या