बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अंकशास्त्र अभ्यासक म्हणतात, नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील…

नाशिक | विविध एक्सिट पोल्सने तर नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील, असा अंदाज वर्तवला आहे. त्यात आता अंकशास्त्र अभ्यासकांची भर पडली आहे. नाशिकचे अंकशास्त्र अभ्यासक नरेंद्र धारणे यांनी पंतप्रधान म्हणून मोदीच पुन्हा शपथ घेतील, असं भाकित केलं आहे.

एनडीएला 315 ते 325 जागा मिळतील आणि भाजप पुर्ण बहुमताने सत्तेत येईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

मोदींची जन्मतारीख 17-09-1950 आहे. या सगळ्या आकड्यांची बेरीज केली तर त्याची बेरीज होती 6. त्यामुळे 6 आकडा हा मोदींचा भाग्यांक आहे. तोच आकडा त्यांना जिंकून देईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

अंकशास्त्र हे 100 टक्के खरं आहे. त्यामुळे माझी भविष्यवाणी खरीच ठरणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

-वैद्यकिय प्रवेशातील मराठा आरक्षण अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी!

-काँग्रेसला धडकी भरवणारा योगेंद्र यादवांचा अंदाज!

काँग्रेसने मुस्लीमांचा फक्त वापर करुन घेतला; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

-महाराष्ट्रातील ‘या’ भाजप उमेदवाराला विजयाची पक्की खात्री; निकालापूर्वीच दिली मिठाईची ऑर्डर

-शहांकडून उद्धव ठाकरेंसाठी खास पुरणपोळीचा बेत; पण डीश सर्व्ह करायला जाणार हे शिवसेना नेते

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More