‘या’ जन्मतारखेच्या मुलांशी डेट करताना जरा विचार करा, कोणत्याही क्षणी धोका…

Numerology These Birthdates Struggle in Relationships

Numerology | अंकशास्त्रानुसार (Numerology), प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव त्याच्या जन्मतारखेशी संबंधित असतो. अनेक मुलींची इच्छा असते की, त्यांचा जोडीदार त्यांना समजून घेईल, त्यांचे कौतुक करेल आणि त्यांना खास वाटण्यासाठी सरप्राईज देईल. मात्र, काही विशिष्ट जन्मतारखांच्या मुलांना त्यांच्या गर्लफ्रेंडचे नखरे सहन होत नाहीत आणि ते त्यांच्याकडे विशेष लक्ष देत नाहीत, असे अंकशास्त्रात सांगितले जाते.

अंकशास्त्रानुसार, 4,8,13,18 ,22,27 आणि 31 तारखेला जन्मलेल्या मुलांना त्यांच्या गर्लफ्रेंडच्या मूड स्विंग्स आणि नखऱ्यांचा त्रास सहन होत नाही. हे लोक त्यांच्या गर्लफ्रेंडपेक्षा स्वतःला अधिक महत्त्व देतात आणि त्यांच्या जोडीदाराच्या लहानसहान गोष्टींकडे फारसे लक्ष देत नाहीत.

मुलींच्या भावना समजून घेण्यात कमी

🔹 या जन्मतारखांना जन्मलेले पुरुष आपल्या गर्लफ्रेंडच्या भावना सहज ओळखू शकत नाहीत.
🔹 सरप्राईज देणे, अचानक भेटवस्तू देणे हे त्यांच्या स्वभावात नसते.
🔹 त्यांना एकट्याने खरेदी करणे अधिक आवडते, त्यामुळे गर्लफ्रेंडसोबत वेळ घालवणे त्यांना तितकेसे आवश्यक वाटत नाही.
🔹 कोणालाही पटकन गिफ्ट देण्यापेक्षा, ते स्वतःसाठी खरेदी करण्यात अधिक रस घेतात.

ही मुलं वैवाहिक जीवनात निष्ठावान

4,13,22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूळ संख्या 4 असते आणि त्यांचा स्वामी ग्रह राहू असतो. हे लोक गर्लफ्रेंडच्या नखऱ्यांकडे दुर्लक्ष करत असले, तरी ते विवाहानंतर त्यांच्या जोडीदाराशी प्रामाणिक राहतात. ही मुलं आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ असतात आणि कधीच फसवत नाहीत, असे अंकशास्त्रात म्हटले आहे. (Numerology)

Title : Numerology These Birthdates Struggle in Relationships

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .