अत्यंत आळशी पण तेवढेच बुद्धिमान असतात ‘या’ जन्मतारखेचे लोक

Numerology | अंकशास्त्र देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याची गणना करते. अंकशास्त्रामध्ये संख्यांची जुळवाजुळव करून व्यक्तीच्या भविष्याविषयी माहिती दिली जाते. अंकशास्त्रात सूर्य, चंद्र, गुरू, युरेनस, बुध, शुक्र, वरुण, शनि आणि मंगळ या नऊ ग्रहांच्या वैशिष्ट्यांच्या आधारे गणना केली जाते.

अंकशास्त्र मूलांक, भाग्यांक आणि नामांक या तीन पद्धतीने व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करते. अंकशास्त्रामध्ये प्रत्येक मूलांकाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या जातात. त्यातच मूलांक 7 असलेल्या लोकांचं खास वैशिष्ट्य सांगितलं गेलंय.

आळशी पण बुद्धिमानही असतात ‘असे’ लोक

अंकशास्त्रामध्ये सांगितलं गेलंय की, 7, 16 किंवा 25 या जन्मतारखेचे लोक हे अत्यंत आळशी स्वभावाचे असतात. त्यांची सगळीच कामे ही उशिराने होतात. आळस केल्यामुळे असे लोक नेहमीच मागे राहतात. त्यांच्या आळसामुळे यश त्यांच्याकडे लवकर चालून येत नाही.

या लोकांना कोणतंच काम करताना उलास येत नाही.असे लोक हुशार असतात.पण, यांचा आळस यांना पुढे जाऊ देत नाही. आजचं काम उद्यावर टाकण्याची सवय यांना भारी पडते, त्यांच्या या स्वभावामुळे (Numerology) कधी-कधी आलेल्या संधीही त्यांना मिळत नाहीत.

प्रेमाच्या बाबतीत ‘असे’ लोक खूप निष्ठावान असतात

7, 16 किंवा 25 या तारखेला जन्मलेले लोक जरी आळशी असले तरी आपल्या वाणीच्या आणि बुद्धीच्या जोरावर ते सगळे काम पूर्ण करतात.कामात हे लोक स्मार्ट असतात, नोकरी असो किंवा व्यवसाय, या दोन्हीमध्ये ते चांगलं यश मिळवतात.

अशा लोकांना जास्त मेहनत करावी लागत नाही. धाडसी गोष्टी करायला यांना खूप आवडतं, त्यांचं मन कधीच शांत राहत नाही. सतत काहीतरी वेगळं करण्याची इच्छा यांना होते. हे लोक (Numerology) प्रेमाचा आव आणत नाहीत, तर खऱ्या मनाने प्रेम करतात. आपल्या जोडीदाराप्रती ही लोक नेहमी निष्ठावान असतात.

News Title : Numerology

महत्वाच्या बातम्या- 

काँग्रेस किती जागा जिंकणार?; नाना पटोलेंनी सांगितला आकडा

आयुष्यात यश मिळवायचं असेल तर ‘या’ सवयी आजच सोडा!

अपघातानंतर पोलिस आयुक्तांना फोन केला होता का?; अजित पवारांचा मोठा खुलासा

नताशाला 70 टक्के हिस्सा दिल्यावर हार्दिककडे काय उरणार?, एकूण संपत्ती किती?

गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ; मुकेश अंबानींना टाकलं मागे