देश

तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँचा पतीसोबतचा बेडरूममधील व्हिडीओ व्हायरल!

कोलकाता | बंगाली चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ सतत चर्चेत असतात. कधी सोशल मीडियावरचे फोटो तर कधी संसदेतील वक्तव्य अशा वेगवेगळ्या कारणांनी त्यांची चर्चा होते. सध्या त्यांचा बेडरूममधील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ नुसरत यांच्या एका फॅनपेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये नुसरत आणि त्यांचे पती निखिल ‘हे शोना…’ या गाण्यावर अ‍ॅक्टिंग करताना दिसत आहेत. या ‘टिक टॉक’ व्हिडीओमधील या कपलची रोमॅन्टिक केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. आत्तापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.

निवडणूक जिंकल्यानंतर नुसरत यांनी आपल्या रिलेशनशिपबद्दल इन्स्टाग्रामवर माहिती दिली होती. कोलकाताचा प्रसिद्ध व्यावसायिक निखिल जैनसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचा खुलासा त्यांनी तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये केला होता.

दरम्यान, नुसरत आणि पती निखिल दोघेही त्यांच्या कामात बीझी आहेत. मात्र हे दोघंही त्यांच्या बिझी शेड्यूलमधून एकमेकांसाठी वेळ काढतात. नुसरत यांनी व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

 

 

View this post on Instagram

 

@nusratchirps love @nikhiljainoffcl #njrocks⚡⚡⚡⚡ #thenjaffair #lifeline💕 #tiktok

A post shared by Nusrat jahan fan (@nusrat.jahan.fan) on

 

 

ठळक बातम्या-

…म्हणून आढळरावांचे पीए खासदार अमोल कोल्हेंच्या दरबारी!

मोदींशी तुलना म्हणजे शिवाजी महाराजांचा सन्मानच; भाजपच्या माजी आमदाराचं वक्तव्य

नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांची कामगारांना मारहाण

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या