Top News देश

“गळाभेट घेऊन रामाचं नाव घ्या; गळा दाबून नाही”

नवी दिल्ली | नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाषणाला जाताना ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे त्यांनी भाषण करण्यास नकार दिला. यावरून भाजप नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. याच पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी ममतांचा बचाव करताना  ट्विट केलं आहे

गळाभेट घेऊन रामाचं नाव घ्या, गळा दाबून नाही, असं नुसरत जहाँ यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे कार्यक्रम होता.

स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित सरकारी कार्यक्रमात राजकीय आणि धार्मिक घोषणांचा मी तीव्र निषेध करते, असंही नुसरत जहाँ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्यासाठी जय श्रीराम म्हणजे वळूला लाल कापड दाखवण्यासारखं आहे. याच कारणामुळं त्यांनी व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये आपलं भाषण थांबवलं, अशा शब्दात हरियाणाचे गृहमंत्री अनिस विज यांनी टीका केली आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

“पुणे हे राष्ट्रीय स्वंयंसेवक संघाचा अड्डा”

“ममता बॅनर्जी जय श्रीरामच्या घोषणा म्हणजे वळूला लाल कापड दाखवण्यासारखं”

राजकारणासाठी कोरोना लस व्यतिरिक्त अनेक व्यासपीठ, तिथं या दोन हात करु- अमित शहा

TikTok सह इतर चायनिज अ‍ॅप्सवरील बंदी कायम राहणार

आगे आगे देखो होता है क्या- प्रसाद लाड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या