Top News देश

‘कोरोनापेक्षा जास्त घातक भाजप’; खासदार नुसरत जहाँचा भाजपवर निशाणा

नवी दिल्ली | पश्‍चिम बंगालमध्ये निवडणुकीचे वारे वाहायला सुरूवात झाली आहे. भाजपने तृणमुल कॉंग्रेसचे नेते फोडले आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रचारसभांमधून दोन्ही पक्षाते नेते एकमेकांवर टीका करत असतात. अशातच तृणमुल कॉंग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी भाजपवर तिखट शब्दात टीका केली आहे.

कोरोनापेक्षा जास्त घातक भाजप असल्याचं नुसरत जहाँ यांनी म्हटलं आहे. पश्‍चिम बंगाल मधील एका जिल्ह्यातील एका प्रचार सभेत बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे. नसरत जहाँ यांनी केलेल्या टीकेमुळे त्यांच्यावरह भाजप नेत्यांनी टीका केली आहे.

भाजप पक्षातील नेत्यांना बंगाली संस्कृती माहिती नसून त्यांना मानवतेवर विश्वास नाही. त्यामुळे हा पक्ष देशासाठी कोरोनापेक्षाही घातक असल्याचं नुसरत जहाँ म्हणाल्या. यावर तृणमुलचे नेते अशा प्रकारची बेताल वक्तव्य करत आहेत मात्र त्यांच्या नेत्या ममता बॅनर्जी या त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भाजप नेते अमित मालवीय यांनी केला आहे.

दरम्यान, तृणमुलचे मंत्री सादिकुल्ला चौधरी यांनीही अशा प्रकारचं आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. आता नुसरत जहॉं बरळल्या आहेत पण ममता बॅनर्जी या तुष्टीकरणाची राजनिती करत असल्याचं मालवीय म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘पदावर बसणाऱ्यांकडूनच महिलांवर अत्याचार होत असतील तर…’; रक्षा खडसे आक्रमक

“स्वयंघोषित ‘जाणता राजा’ शरद पवार यांनी राजकीय स्वार्थासाठी नवा शोध लावला”

“…पण जयंतरावांच्या बॉसला हे अजूनही जमत नाही”

कोरोनाबाधितांच्या संख्येत अशीच वाढ होत राहिली तर…- अजित पवार

“माझा अरुण बेकसूर हाय…त्याच्यावरील संमदे आरोप खोटे हाय”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या