बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऐकावं ते नवलंच! ‘ओ कोरोना कल आना’चे लागले पोस्टर

वाराणसी| कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरातील हजारो लोकांचे प्राण गेले आहेत. या भयानक व्हायरसपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण काळजी घेत आहे. यादरम्यान कोरोना व्हायरसशी संबंधित एक वेगळीच गोष्ट समोर आली आहे. वाराणसीमधील काशीच्या गल्ल्यांमध्ये स्त्री चित्रपटाच्या धर्तीवर ‘ओ कोरोना कल आना’चे पोस्टर लावले जात आहे.

हा पोस्टर एका चित्रपटापासून प्रेरीत होऊन बनवला आहे. लोकांनी जागरूक व्हावे आणि हा विचार करावा की, मी आज सुरक्षित राहिन आणि कोरोनासारखा आजार दूर पळवण्यासाठी प्रयत्न करेन. त्यासाठी साफसफाई, सॅनिटायजर व मास्कचा वापर करेन हा यामागचा माझा हेतू  आहे. असं पोस्टर छापणाऱ्या व्यक्तीने एका प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं.

हा पोस्टर स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांना जागरूक करण्यासाठी लावले आहेत. सर्व सुरक्षित राहोत आणि याबाबत कोणतीही अंधश्रद्धा पसरवू नये. हा पोस्टर संदेश देण्यासाठी लावला आहे. असंही त्या व्यक्तीने यावेळी सांगितलं.

देशातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या देशातील कोरोना रूग्णांची संख्या 130च्या वर गेली असून. कोरोनामुळं देशभरात 3 जणांचा मृत्यु झाला आहे. विविध माध्यमातून सरकार कोरोनासंदर्भात जनजागृती करत आहे.

 

 

 

View this post on Instagram

 

O corona kal aana🤘 #corona #coronamemes #ocoronakalaana #instagood #memes

A post shared by …. (@faad.magician) on

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाला पिटाळण्यासाठी कैदीही झाले सज्ज; तयार करणार लाखो मास्क!

“…तर नाईलाज झाल्यास कठोर निर्णय घेऊ- राजेश टोपे

महत्वाच्या बातम्या-

लग्न करू शकता बरं का… लग्न समारंभावर बंदी नाही- पुणे जिल्हाधिकारी

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ‘मास्टर ब्लास्टर’ सचिनचं जनतेला आवाहन

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More