बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’; युवक काँग्रेसचं बोंबाबोंब आंदोलन

सातारा | गेल्या वर्षभरापासून कोरोनाने सगळीकडे थैमान घातलं होतं. यामुळे सर्वसामान्य माणसांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. मे महिन्यापासून पेट्रोल-डिझेलच्या भावात देखील वाढ व्हायला सुरूवात झाली होती. पेट्रोल-डिझेलचे भाव अलिकडे गगनाला भिडले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या माहागाईमुळे नागरिक त्रस्त आहेत. अशातच आता काँग्रेसने या भाववाढीवर आक्रमक भूमिका घेेतली आहे.

सातारा येथील बाँम्बे रेस्टाॅँरेन्ट चौक परिसरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बोंबाबोंब आंदोलन केलं आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेली वाढ आणि महागाई विरोधात त्यांनी आक्रमकपणे आंदोलन केलं. त्यावेळी त्यांनी नुकतचं प्रसिद्ध झालेलं गाणं ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट, अशा घोषणा देखील दिल्या.

पेट्रोल भरण्यासाठी पंपावर येणाऱ्या नागरिकांकडून महागाई विरोधात स्वाक्षरी घेवून मोहीम राबवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फलकासमोर हे आंदोलन करण्यात आलं होतं. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. काँग्रेसच्या काळात आरडाओरड करणारे भाजप सरकार आता गप्प का आहे?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

दरम्यान, गेल्या 6 महिन्यांत देशात पेट्रोलच्या किंमती जवळपास 66 वेळा वाढल्या आहेत. यावरूनच केंद्राचं महागाई कमी करण्यापेक्षा महागाई वाढवण्याचंच धोरण असल्याचं दिसून येत आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी केली होती. तर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्याक्ष नाना पटोले यांनी देखील सायकल राॅली काढून इंधन दरवाढी विरूद्ध आंदोलन केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

गब्बर सेनेकडून लंकादहन; 7 गडी राखून भारताचा श्रीलंकेवर दमदार विजय

‘…तेव्हा वडिलांच्या औषधांसाठीही पैसे नव्हते’; वडिलांच्या आठवणीत नाना भावूक

“जास्त आगाऊपणा करू नका, जेवढी स्क्रिप्ट दिली, तेवढंच बोला”

“शरद पवारांनी एनडीएत यावं अन् राज्यात भाजप-राष्ट्रवादीनं सरकार स्थापन करावं”

मुंबईमध्ये रेस्क्यू टीम स्पॉटवर ठेवा, धोकादायक इमारतीमधील लोकांचं स्थलांतर करा- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More