बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ओए चारो तरफ घुम के बॅट दिखा; जेव्हा विराट इशान किशनकडे बघून ओरडतो, पाहा व्हिडीओ

अहमदाबाद | मुंबई इंडियन्सचा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनने पदार्पणाच्या सामन्यात धडाकेबाज खेळी केली. शिखर धवनच्या जागी सलामीला खेळण्याची संधी मिळालेल्या इशानने 32 चेंडूंत 56 धावा ठोकल्या. इशानने 5 चौकार व 4 षटकार खेचले आणि पदार्पणात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम नावावर केला. शिवाय टी-20 पदार्पणात अर्धशतक झळकावणारा तो अजिंक्य रहाणेनंतर पहिला भारतीय ठरला. कर्णधार विराट कोहलीसह त्यानं दुसऱ्या विकेटसाठी 94 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. 165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराटनंही 49 चेंडूंत नाबाद 73 धावांची खेळी केली.

पहिल्याच सामन्यात आत्मविश्वासानं खेळ करणाऱ्या इशानने प्रत्यक्ष मैदानावर घडलेला एक किस्सा सांगितला. युझवेंद्र चहल याने सामन्यानंतर घेतलेल्या मुलाखतीत इशाननं हा किस्सा सांगितला. माझे अर्धशतक झाले, हेच मला माहित नव्हते आणि जेव्हा विराट कोहली अभिनंदन करायला आला तेव्हा मला ते समजलं, असं त्याने सांगितलं.

जेव्हा अर्धशतक झाले, तेव्हा आम्ही पाहिलं की दोन-तीन सेकंद तू बॅटच उंचावली नव्हतीस. तुझं अर्धशतक झालं आहे, हे तुला माहित नव्हते का? तू थोडा नर्व्हस झाला होतास का?, असा प्रश्न चहलने त्याला विचारला. त्यावर इशान म्हणाला, ‘विराट भाई मागून ओरडला, ओए चारही बाजूला फिर आणि बॅट दाखव. सर्वांना बॅट दाखव, तुझी ही पहिलीच मॅच आहे.

दरम्यान, इशान किशन आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियानं दुसरा सामना 7 विकेट्स राखून जिंकला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी मिळवली.

थोडक्यात बातम्या –

नवऱ्यानं कापलं बायकोचं ओठ आणि नाक; कारण ऐकून पोलीसही हादरले

तापमान वाढल्यामुळे हिंजवडी परिसरात आग लागण्याचं प्रमाण वाढलं; स्थानिकांनी शेअर केला व्हिडिओ!

राज्याचे गृहमंंत्री आणि मुंबईचे पोलीस आयुक्त बदलणार? जयंत पाटील म्हणाले…

लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

तरूणाला खुलेआम प्रपोज करणं ‘तिला’ पडलं चांगलंच महागात, पाहा व्हिडिओ!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More