बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय?, आरोग्य भरतीसाठी एजंटमार्फत 15 लाख मागितले”

मुंबई | सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत गट क आणि गट ड प्रवर्गातील जागांसाठी होणारी भरती ऐनवेळी रद्द करण्यात आली. त्यामुळे राज्यभरातून विद्यार्थ्यांनी राज्य सरकारवर संताप व्यक्त केला होता. त्यावरून विरोधी पक्षांनी देखील सरकारवर टीकास्त्र सोडलं. आता याच पार्श्वभूमीवर ओबीसीचे नेते प्रकाश शेंडगे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

बाह्यस्त्रोत संस्था ‘न्यासा’ यांच्या अकार्यक्षमतेमुळे आरोग्य विभागाची भरती पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आरोग्य भरतीसाठी एजंटमार्फत 15 लाख रूपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. यासंदर्भात एक ऑडिओ क्लिपसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि या ऑडिओ क्लिपची चौकशी देखील झाली पाहिजे, अशीही मागणी प्रकाश शेंडगे केली आहे.

भरती प्रक्रियासाठी राज्य सरकारने दिलेल्या ‘न्यासा’ या कंपनीचा मालक 84 दिवस तुरूंगात जाऊन आला आहे. याची कल्पना राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना देखील होती. तरीही अशा कंपनीच्या हातात लाखो तरूणाचं भविष्य राज्य सरकारने दिलं. ही कंपनी उमेदवारांना परीक्षा केंद्र चीन आणि मध्यप्रदेशमध्ये देते. इतकं सगळं होऊन देखील सरकार हे कॉन्ट्रॅक्ट त्याच कंपनीला देत आहे. महाराष्ट्रात नेमकं काय चाललं आहे? असाही सवाल प्रकाश शेंडगे यांनी राज्य सरकारला केला आहे.

दरम्यान, आरोग्य विभागाची भरती प्रवेशपत्रांवरून अगोदरच गोंधळामुळे चर्चेत होती. 25 आणि 26 सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा न्यासा या कंपनीने घेण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर आरोग्य विभागाकडून ती परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे अनेक उमेदवारांना याचा मनस्ताप सहन करावा लागला.

थोडक्यात बातम्या- 

‘भारत बंद’ दरम्यान दिल्ली-हरियाणा सीमेवर शेतकऱ्याचा मृत्यू; पोलिसांनी सांगितलं ‘हे’ कारण

“दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही, इतिहासाची पुनरावृत्ती करणारा हाच ‘तो’ दिवस”

‘आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी द्या’; राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांची व्यापाऱ्यांना विनंती

“हे शेतकऱ्यांचं आंदोलन, शिवसेनेचा ‘भारत बंद’ला मनापासून पाठिंबा”

‘केंद्र सरकार फक्त बोलतं, आता 10 वर्ष लागली तरी…’; राकेश टिकैत आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More