बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जातंय, सर्वाधिक छळ गोपीनाथ मुंडेंचा झाला”

जळगाव | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. मागील काळात ओबीसी नेत्यांना भाजपनं नेहमीच सहकार्य केल्याचं पाहायला मिळत होतं. पण गेल्या काही वर्षात भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जात केलं जात असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे.

गेल्या 4 – 5 वर्षांचा विचार केला तर भाजपचे काही नेते ओबीसी नेत्यांना टार्गेट करत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपमध्ये सर्वात जास्त गोपीनाथ मुंडे यांचा छळ करण्यात आला, असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी एकनाथ खडसेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

एकनाथ खडसेंनी यावेळी गिरीश महाजनांवरही टीकास्त्र सोडलं. माझी तब्येत एकदम ठणठणीत आहे. गिरीश भाऊ यांना खात्री करायची असेल तर ते करू शकता. तसेच गिरीश महाजन यांचा आपल्याला सर्व इतिहास माहिती असून त्यांना राजकारणात जन्माला मी आणलंय, असं खडसे म्हणाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात व्हायरल ऑडियो क्लीपवरुन चांलगाच कलगीतुरा रंगल्याचं पहायला मिळालं. मी खडसे यांना दोष देणार नाही. वाढतं वय, एवढे आजार आणि त्यामध्ये जो माणूस मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा करत होता त्याला बिचाऱ्याला आमदारकीपण मिळत नाहीय. त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं आहे. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल कोणताही रोष नाही. त्यांनी बोलत राहावं, असं महाजन म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या- 

‘…हे पाहून अतिशय दु:ख होतय’; लालू प्रसाद यादव यांनी मोदींना सुनावलं

“अभिनेता अरबाज खानकडूनही परमबीर सिंह यांनी पैसे घेतले”

“मोदींनी देशाला चीनचा कचरा, चिंता आणि चिता हे तीन चि दिले”

“उद्धव ठाकरेंसारखा स्वातंत्र्य देणारा मुख्यमंत्री लाभला हे माझं नशीब”

कुठल्याही हमीशिवाय PPF खात्यावर मिळणार कर्ज; फक्त ‘या’ अटी करा पूर्ण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More