बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाविकास आघाडी सरकारमधील ओबीसी मंत्र्यांचं माकड झालंय”

सांगली | राज्यात गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. त्यावरून राज्यातील वातावरण चांगलच तापलं आहे. अशातच भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीतील ओबीसी नेत्यांवर हल्लाबोल केला आहे.

ओबीसी मंत्र्यांचं माकड झालंय, असं म्हणत पडळकरांनी महाविकास आघाडीतील ओबीसी नेत्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. गोपीचंद पडळकर यांनी सांगलीमधील झरेमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

जिथं ओबीसी मंत्र्यांच्याही शब्दाला मातीची किंमत नाहीये, तिथं सर्वसामान्य ओबीसींविषयी या प्रस्थापितांना किती आकस असेल. एकीकडे ओबीसी मंत्री म्हणतात जो पर्यंत ओबीसी आरक्षण पुन्हा प्रस्थापित होणार नाही, तो पर्यंत आम्ही निवडणूक होऊ देणार नाही. पण दुसऱ्याच दिवशी निवडणूका जाहीर होतात. काय किंमत झालीये ओबीसी मंत्र्यांची? तुम्ही काय फक्त प्रस्थापितांना मुजरे घालण्यासाठी मंत्री झालात का? तुम्ही सत्तेसाठी ओबीसींचा आत्मसन्मानही विकला का?, असे सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत.

तसेच आता बास झालं. ओबीसी भटके विमुक्त बहुजन समाजाचा विश्वास घात करून निवडणूका घ्याल तर ओबीसी समाज दणका दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. ही ओबीसी बहुजनाच्या आक्रोशाची आग महाराष्ट्रभर पेटेल. आणि येत्या 26 तारखेला तुम्ही समस्त ओबीसी, भटके, बहुजन, अठरापगड बारा बलुतेदार समाजाची ताकद बघालच. तुमच्या गढ्यांना धक्का द्यायला आम्ही येतोय, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे सरकारला सूचक इशारा दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

नाना पटोले तातडीने दिल्ली दरबारी, ‘स्वबळाची भाषा’ कारण?

‘लस न घेतलेल्या आमदारांना विधानसभेत प्रवेश नाही’; बिहार विधानसभा अध्यक्षांचं फर्मान

‘लशींसाठी मोदींचे जाहीर आभार माना’; युजीसीची महाविद्यालयांना अजब सूचना

‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटमुळे तिसरी लाट येणार का?; तज्ज्ञ म्हणतात…

आंबिल ओढा परिसरातील नागरिक आणि पोलीसांमध्ये तुफान राडा; नागरिकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More