बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठाकरे सरकारला मोठा झटका! OBC आरक्षणाच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

मुंबई | राज्य मंत्रिमंडळाने 22 सप्टेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 27 टक्के आरक्षण (OBC reservation) लागू करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर सरकारने हा अध्यादेश मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवला होता. यापूर्वी 23 सप्टेंबर रोजी राज्यपालांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू करण्यास मान्यता दिली होती. त्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्त्वाचा निर्णय दिला आहे. (Supreme Court stays OBC reservation ordinance)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ओबीसींना 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे हा सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला मोठा झटका असल्याचं म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाला दिलेले नोकरी आणि शिक्षणातील आरक्षण वगळता राजकीय आरक्षणावर स्थगिती दिली होती. त्यानंतर ठाकरे सरकारने पदोन्नती आरक्षण देखील रद्द केलं होतं. त्यानंतर 50 टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेच्या आधीन राहून ओबीसी आरक्षणाबाबत अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात हा विषय गेल्या काही महिन्यापासून सुरू आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने ठाकरे सरकारला घेरलं होतं. त्यामुळे आता राजकिय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

“आनंद दवे हा डॅंबिस माणूस, त्यांनी…”, शरद पोंक्षेंची फेसबूक पोस्ट चर्चेत

“आईचे दूध पिलेले असेल तर आरोप सिद्ध करून दाखवा”

“सावरकरांना वैज्ञानिक दृष्टीकोन होता, भाजपने विनाकारण…”

“एक बाई उठते अन् तिला…”, बाळासाहेब थोरातांनी घेतला समाचार

Omicron वाढतोय, शाळा सुरू होणार का?; वर्षा गायकवाड म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More