ओबीसी आरक्षणासंदर्भात ‘हा’ मोठा निर्णय होण्याची शक्यता

नवी दिल्ली | ओबीसी आरक्षणाबाबत आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षणाचं त्रिविभाजन होणार असल्याचं कळतंय. हिन्दुस्तान टाईम्सने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

ओबीसींमध्ये २६३३ जातींचा समावेश आहे. त्यांना एकूण २७ टक्के आरक्षण मिळतं. मात्र या आरक्षणाचा लाभ काही मोजक्याच जातींना होत असून अनेक जाती आरक्षणापासून वंचित असल्याचं समोर आलं आहे.

माजी न्यायमूर्ती जी रोहिणी यांचा आयोग यासंदर्भात अभ्यास करत असून हाच आयोग ओबीसी आरक्षणाच्या त्रिविभाजनाची शिफारस करण्याची शक्यता आहे.

त्रिविभाजन झाल्यास सध्या लाभ मिळत नसलेल्या जातींना १० टक्के, अंशतः लाभधारक जातींना १० टक्के तर सर्वाधिक लाभ घेतलेल्या जातींना ७ टक्के आरक्षण मिळू शकतं.

महत्वाच्या बातम्या

-जगनमोहन यांच्या ‘वायएसआर’ला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मोठी ऑफर

-सपना चौधरीच्या कार्यक्रमात जोरदार गोंधळ; पोलिसांचा लाठीचार्ज

-अमोल कोल्हे कृष्णकुंजवर राज ठाकरेंना भेटणार???

-धरणाचे पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

-धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करा; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश