बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

OBC Reservation: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली मंत्रिमंडळाची बैठक; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला धक्क्यावर धक्के दिले आहेत. ओबीसी आरक्षणासंदर्भात (OBC reservation) सर्वोच्च न्यायालयात (SC) झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारने इम्पेरिकल डेटा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यावरून आता राजकारण पेटताना दिसतंय.

सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ओबीसी आरक्षणावर या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आला आहे. ओबीसी आरक्षणासाठी डेटा तयार होत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे.

मंत्रिमंडळात पास झालेला ठराव निवडणूक आयोगाला पाठवला जाणार आहे. पूर्ण वेळ डेटा तयार करण्यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.

दरम्यान, सरकारचा 98.87 टक्के  डेटा जर योग्य आहे तरी दिला नाही. डेटा गोळा करेपर्यंत निवडणुका पुढे ढकलायचा आणि निवडणूक आयोगाला हा निर्णय कळवू, असा निर्णय आम्ही घेतला आहे, असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं.मु

थोडक्यात बातम्या-

तळीरामांसाठी खुशखबर! ठाकरे सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

“अजित पवारांनी माफी मागून राजीनामा द्यावा”

“पंतप्रधानांचं सोडा, अर्थमंत्र्यांनाही अर्थशास्त्र कळत नाही, दोघंही घमेंडी”

“कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, त्यांची छटाकभर लायकी मात्र…”

रुपाली पाटील ठोंबरेंचं ठरलं, राष्ट्रवादीतच जाणार?; हे आहेत स्पष्ट संकेत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More