‘छगन भुजबळांना टार्गेट करून मनोज जरांगे…’; ‘या’ नेत्याच्या आरोपाने खळबळ

OBC Reservation | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सगेसोयरे आरक्षणासाठी लढा देत आहेत. ते सरकारकडे सगेयोसरे आरक्षणाची मागणी करत आहेत. यामुळे आता एससी आणि एसटी वर्गाचे देखील आरक्षण जाऊ शकतं असं ओबीसी नेते आणि उपोषणकर्ते लक्ष्मण हाके म्हणाले आहेत. यामुळे मराठा नेत्यांचीही मान खाली जाईल. ओबीसी समाजावर (OBC Reservation) अन्याय होत असताना विचारवंत कुठे आहेत?. छगन भुजबळांना टार्गेट करून मनोज जरांगे धनगरांचं आयुष्य उद्धवस्त करायला निघाले आहेत, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय.

ते मराठा नेत्यांना म्हणाले की, जरांगेंच्या कृतीमुळे तुम्हालासुद्धा तोंड काळं करावं लागेल. आमच्यावर अन्याय होत असताना महाराष्ट्रातील विचारवंत कुठेत?, असा सवाल लक्ष्मण हाकेंनी केला आहे. (OBC Reservation)

“जरांगे धनगरांचं घर उद्ध्वस्त करत आहेत” 

तुम्हाला पैशाचा आणि सत्तेचा माज आहे. यावेळी तुम्ही हॉलिकॉप्टरने पैसे वाटले तरीही तुम्हाला ओबीसी (OBC Reservation) मतदान करणार नाहीत. धनगर समाजाचे नेते अठरापगड जातीच्या संरक्षणार्थ आहेत. भुजबळांना टार्गेट करत आता मनोज जरांगे पाटील हे धनगरांचे घर उद्ध्वस्त करायला निघाले आहेत, असं लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.

कुणबी नोंदी फ्रॉड

कुणबी नोंदी या फ्रॉड आहेत. त्या कोणत्या निकषाने देण्यात आल्या आहेत याबाबत शासनाने आम्हाला माहिती द्यावी. महाराष्ट्रात तुम्ही दहशतीचं वातावरण तयार केलं आहे. तुम्ही बीडमध्ये कोणाची बस आणि हॉटेल जाळलं याबाबत तुम्हीच ओबीसी वाद निर्माण करत आहेत, असं ते म्हणालेत.

पुढे ल्क्ष्मण हाके म्हणाले की “ई डब्ल्यू एसमध्ये दहा टक्के पैकी साडेआठ टक्के लाभ फक्त मराठा समाजाला झाला आहे. शिवरायांच्या स्वराज्यासाठी ओबीसींनी जीव पाणाला लावून कुर्बानी दिली आहे. त्यात माती कालवू नका. (OBC Reservation)

ते पुढे म्हणाले की, सगेसोयरेमुळे ओबीसीच नाहीतर एसटी आणि एससीचं देखील आरक्षण जाऊ शकते. खिरापत वाटल्याने कुणबी प्रमाणपत्र वाटलं. आता अशावेळी अन्याय होत असताना विचारवंत कुठे आहेत?” असा प्रश्न लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

News Title – OBC Reservation Hunger Strike Laxman Hake Slam To Manoj Jarange Patil About NT, OBC And SC, ST Reservation

महत्त्वाच्या बातम्या

राजकारण तापणार! शिंदे गटाच्या नेत्याचा प्रणिती शिंदेंवर गंभीर आरोप

“ही घराणेशाही नाही, शरद पवार आणि अजित पवारांचं कुटुंब वेगवेगळं”

इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी सरकार देणार सबसिडी?, मोठी माहिती आली समोर

मोठी बातमी! प्रसिद्ध गायिका अलका याग्निक दुर्मिळ आजारानं त्रस्त, दोन्ही कान..

“छगन भुजबळांचं उभं आयुष्य गोरगरीबांचं आरक्षण हिसकावण्यात गेलंय”