ओबीसी आरक्षणप्रश्नी शरद पवारांची केंद्राकडे मोठी मागणी!
मुंबई | मुंबईत राष्ट्रवादीकडून ओबीसी आरक्षण राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शरद पवारांनी ओबीसी आरक्षणावरून केंद्रावर सडकून टीका केली.
केंद्र सरकारने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी. एकदा कळू द्या देशाला की नक्की काय संख्या आहे, सत्य काय ते समोर येऊ द्या, असं शरद पवार म्हणालेत.
जोपर्यंत सन्मानाने आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आरक्षणाचा लढा सुरुच ठेवण्याची गरज आहे. अनेक लोक प्रश्न उपस्थित करताता की यांची नेमकी लोकसंख्या किती, त्यासाठी काय करायचं, तेवढी लोकसंख्या आहे की नाही, अशी शंका उपस्थित करतात. मला आनंद आहे, की तुम्ही या परिषदेत एक याचिका मान्य केली, असंही ते म्हणाले.
जातीनिहाय जनगणनेचा निर्णय केंद्रातील भाजप सरकारकडून होईल असं वाटत नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
थोडक्यात बातम्या-
मंकी पॉक्सबाबत राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती
“यापुढे जर कोणत्याही घटनेत शरद पवारांचं नाव गोवण्याचा प्रयत्न केला तर…”
ज्ञानवापी प्रकरणावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“मी पुन्हा येईन हे खरं करुन दाखवू, ते ही ब्रह्मदेवास चुकवून”
“बारामतीच्या गड्याच्या अंगात कसले पार्ट घातले होते हे मी मेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार”
Comments are closed.