मोठी बातमी! लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावली

OBC Reservation | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन आणि उपोषण करताना दिसत आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील लढत आहेत. ओबीसी (OBC Reservation) समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी भूमिका ओबीसी (OBC Reservation) समाजाची आहे. यामुळे आता ओबीसी (OBC Reservation) समाजाचे नेते लक्ष्मण हाके आणि सहकारी नवनाथ वाघमारे हे उपोषणाला बसले आहेत.

राज्यातील मंत्री लक्ष्मण हाकेंच्या भेटीला

ओबीसी नेते लक्ष्मण हाके गेल्या आठ दिवसांपासून उपोषण करताना दिसत आहेत. यावेळी राज्य सरकारमधील मंत्री आणि नेत्यांनी लक्ष्मण हाकेंची भेट घेतली. मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन आणि अतुल सावेंनी लक्ष्मण हाकेंची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी यावेळी उपोषणस्थळी उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली. (OBC Reservation)

लक्ष्मण हाकेंची तब्येत खालावली आहे. त्यांनी उपोषण सोडावं यासाठी उपोषणस्थळी त्यांना विनंती करायला आलो असल्याचं गिरीश महाजन म्हणाले आहेत. शासन त्यांच्या मागण्यांबाबत समाधानी आहे. मराठा आणि ओबीसी समाजाबाबतही सकारात्मक असून आपल्याला अपेक्षित पावलं सरकार उचलणार असल्याचं गिरीश महाजन म्हणाले आहेत.

मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का लागणार नाही. इथलं शिष्टमंडळ मुंबईला पाठवलं पाहिजे. पहिल्या नाहीतर दुसऱ्या टप्प्यात यावर तोडगा निघेल, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत. लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिव येथे देखील दोन कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत.

मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील वडीगोद्रीकडे ओबीसी समाज आंदोलन आणि उपोषण करताना दिसत आहेत. त्यांच्या उपोषणाला मराठवाड्यातून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. नांदेडमध्ये अनेक ठिकाणी रास्तारोको सुरू आहे. तसेच नांदेडमधून ओबीसी बांधव 200 गाड्यांचा ताफा घेऊन वडीगोद्रीकडे रवाना झाल्या आहेत.

सांगोला बंद

ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात रान पेटलं आहे. याचा परिणाम हा मराठवाड्याप्रमाणे सांगोलामध्येही दिसून येत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सांगोला तालुका बंदची हाक असल्याची माहिती समोर आली आहे.

News Title – OBC Reservation Laxman Hake Health Issue On State Government Minister Meet With Protest

महत्त्वाच्या बातम्या

“आरक्षण दिलं नाहीतर तुम्हाला संपवणार…”, मनोज जरांगे संतापले

महायुतीत अजित पवारांना एकटं पाडण्याचा डाव?, नाशकात शिंदेंच्या सेनेला झुकतं माप

“मोदींहून सुप्रिया सुळेंना अधिक लीड”; पवारांनी मोदींना डिवचलं

केंद्र सरकार पंकजा मुंडे संदर्भात ‘हा’ मोठा निर्णय घेणार!

पावसाळ्यात होणाऱ्या केसगळतीमुळे त्रस्त आहात?; करा ‘हा’ उपाय