बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

न्यायालयाच्या निकालानंतर छगन भुजबळ आक्रमक, दिला ‘हा’ गंभीर इशारा

मुंबई | ओबीसी (OBC Reservation) राजकीय आरक्षणावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. केंद्र सरकार (Central Government) इम्पेरीकल डेटा देत नाही, असा आरोप राज्यातील नेत्यांकडून होत आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

केंद्र सरकारकडे इम्पेरीकल डेटा नाही. मग देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) कोणता डेटा त्यावेळी केंद्र सरकारकडे मागितला? असा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. त्यावेळेस ते म्हणाले की, डेटा नाही किंवा सदोषपुर्ण आहे. केंद्र सरकार त्यावेळेला काही बोलले नाही. पंरतु, आता केंद्र सरकार आता एकच म्हणत आहे की, आमच्याकडे डेटा नाही. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

येत्या तीन  महिन्यांमध्ये विविध खाती आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना कामाला लावून डेटा जमा करू, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. तसेच आताच्या 17 जानेवारीला पुन्हा सुनावणी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ही निवडणुक जनरलमध्ये होणार आहे. आता आयोगाने जर जलदगतीने काम पार पाडले तर पुढील निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळू शकेल, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, प्रशासनातील सर्व सचिवांनी आयोगाला सहकार्य करावे, एवढेच आपल्या हातात आहे. सरकारही सहकार्य करेल. सचिवांनी इतर कामे बाजूला ठेवून लक्ष केंद्रीत करण गरजेच आहे. आरोप-प्रत्यारोप करून फक्त वेळ वाया जाणार आहे. त्यामुळे आमचं प्राधान्य पुढील तीन महिन्यात आकडेवारी गोळा करण्यावर आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या- 

“निवडणुका होणारच, ते ही ओबीसी आरक्षणाशिवाय”, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

“चंद्रकांत पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आणि महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी”

“हा सगळा प्री प्लॅन होता, त्यांच्या जाण्यानं मनसेला…”

“…म्हणून माझ्यावर पक्ष सोडण्याची वेळ आली”; रूपाली ठोंबरेंनी सांगितलं कारण

Bank worker Strike: …म्हणून उद्यापासून दोन दिवस बँका बंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More