बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सरकार प्रत्येक गोष्टीत मोदींकडे बोट दाखवतं, बायकांनी मारलं तरी ते मोदीजींनी केलं म्हणतील”

नागपूर | ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून आज भाजपने राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनात ठिकठिकाणी प्रविण दरेकर यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात आंदोलनाचं नेतृत्व हाती घेतलं आहे. या आंदोलनात त्यांनी ठाकरे सरकारवर आणि काँग्रेसवर आरोप केले आहेत.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं नाही. आम्ही काढलेला अध्यादेश या सरकारनं लॅप्स केला. महाविकास आघाडी सरकारनं ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला. काँग्रेसची सत्ता असलेल्या छत्तीसगड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये ओबीसी आरक्षण सुरु आहे. मग केवळ महाराष्ट्रातील ओबीसींचं राजकीय आरक्षण का रद्द झालं, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

भाजप आज 1500 ठिकाणी ओबीसी आणि भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. या सरकारला आता ओबीसी आरक्षण द्यावं लागेल नाही तर खुर्ची खाली करावी लागेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. या सरकार मधील मंत्री एकमेकांचं कपडे फाडायला तयार आहे. हे सरकार प्रत्येक गोष्टीत मोदींकडे बोट दाखवत यांच्या बायकांनी याना मारलं तरी ते मोदीजींनी केलं, असं म्हणतील, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहेे.

दरम्यान, ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहेत? या संदर्भातील याचिकाकर्ते सुद्धा काँग्रेसशी संबंधित आहेत. त्यांची उठबस त्यांच्या कार्यालयात आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर आता काँग्रेस काय उत्तर देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

थोडक्यात बातम्या-

ओबीसींचं राजकीय आंदोलन रद्द होणं हे ठाकरे सरकारचं पाप आहे- अशिष शेलार

“मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुन्हा बंदीराष्ट्र बनवू पाहतायत”

केंद्र सरकारचा करदात्यांना माेठा दिलासा; अनुराग ठाकूर यांनी दिली महत्वाची माहिती

कोरोना लस न घेणं पडू शकतं महागात; धक्कादायक माहिती आली समोर

“अरे भाई हिप्पोक्रसी की भी सीमा होती है !!”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More