बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मागासवर्गीय, अनुसूचित जाती जमातींसाठी अर्थसंकल्पात ‘इतक्या’ कोटींची तरतूद

नवी दिल्ली | केंद्र सरकार आपला दुसरा अर्थसंकल्प सादर करत आहे. केंद्रीय अर्थमत्री निर्मला सितारामन यांनी सकाळी 11 वाजता 2020-21 चा अर्थसंकल्प मांडण्यास सुरूवात केली. यावेळी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीयांसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली आहे.

मागासवर्गीयांसाठी 85 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अनुसूचित जाती जमातींसाठी 53 हजार 700 कोटींची तरतूद करण्यात आल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.

सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या धोरणावर आमचं सरकार पुढे जात आहे. भारत आज जगातील विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये आघाडीवर आहे. महागाईवर नियंत्रण ठेवण्यात केंद्र सरकारला यश आल्याचं सीतारामन यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, रोजगार निर्मिती, मंदी या सगळ्याचं सावट देशावर आहे. ढासळत असणाऱ्या अर्थव्यवस्थेवरुन विरोधकांनी केंद्र सरकारवर वारंवार टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर निर्मिला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प मांडला. त्यामुळे या अर्थसंकल्पनात काय असेल याबाबत उत्सुकता आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

…म्हणून मी कोणत्याही थराला जायचं ठरवलं होतं- उद्धव ठाकरे

कामाला जा पैसे कमवून आण…, 75 वर्षीय वृद्ध आईला मुलांनी घरातून हाकललं

महत्वाच्या बातम्या-

शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करणार; मोदी सरकारचा संकल्प

शेतकरी आणि ग्रामीण भारतासाठी निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

महागाईवर नियंत्रण ठेवण्यात केंद्र सरकारला यश- निर्मला सीतारामन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More