बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार- विजय वडेट्टीवार

मुंबई | मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत खासदार संभाजीराजे यांची मुंबईत बैठक झाली. त्यात मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आता ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

ओबीसी आरक्षणासाठी महत्त्वाचा असलेला इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम आयोगाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कोरोनाचं संकट असल्याने डेटा गोळा करणं कठिण आहे. त्यामुळे केंद्राकडून डेटा मिळावा म्हणून आम्ही कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहोत. कोरोना संकटात डेटा गोळा करता येईल का? याबाबत कोर्टाचं मतही जाणून घेणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळावा म्हणून आम्ही केंद्राला दोन पत्रं लिहिली आहेत. पण डेटा मिळाला नाही. मुख्यमंत्र्यांनीही इम्पिरिकल डेटा बाबत पंतप्रधानांना विनंती केली आहे. हा डेटा मिळाला नाही तर सहकार क्षेत्रापासून ते स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंतच्या अनेक निवडणुकांमधील 40 ते 50 हजार जागांवर प्रश्नचिन्हं निर्माण झाले आहेत, असं वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, ओबीसी आरक्षणातील अडथळे कोणते आहेत? ते कसे दूर करता येतील? त्यावर काय उपाय आहेत? याबाबतचं चिंतन करण्यासाठी विजय वडेट्टीवार यांनी लोणावळ्यात एका शिबीराचं आयोजन केलं आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे. या शिबिराला पंकजा मुंडे, नाना पटोले आणि संजय राठोड यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

शिवसेना सर्टिफाईड गुंडाचा पक्ष, राऊतांच्या वक्तव्यावर अजितदादांनी करुन दिली ‘ती’ आठवण

राज्यातील 10 महापालिकेच्या निवडणूका ‘या’ महिन्यात लागण्याची शक्यता!

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट!

12 तास काम करूनही पगार मिळणार कमी; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

कोरोनाला रोखण्यासाठी लेंसेटच्या तज्ज्ञांनी भारताला दिले ‘हे’ 8 महत्वाचे सल्ले!

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More