बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मराठा समाजाला विरोध करण्यासाठी ओबीसींचा आक्रोश मोर्चा नाही”

नाशिक | मराठा आरक्षणाच्या मागणीकडे राज्य सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मराठा क्रांती मूक आंदोलनाची राज्यव्यापी हाक दिली आहे. कोल्हापुरातून आंदोलनाला सुरूवात झाली होती. त्यानंतर आता नाशिकात मराठा आंदोलनाने धडक दिली आहे. यावर नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भूमिका मांडली आहे.

मराठा समाजाला विरोध करण्यासाठी ओबीसींचा आक्रोश मोर्चा नाही, मराठा आणि ओबीसी समाज अडचणीत, काही जण दोन्ही समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे बरोबर नाही, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमच्या पक्षाची भूमिका, इतर पक्षांचीही हीच भूमिका आहे, या भूमिकेशी मी एकनिष्ठ आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

मराठा, ओबीसी आरक्षणासाठी कोर्टात लढताना केंद्र सरकारची नितांत गरज आहे. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण नाकारलं आहे. त्याचबरोबर ओबीसींचं जे आरक्षण होतं ते देखील रद्द केलं आहे. त्यामुळे मराठा समाजाला विरोध करण्यासाठी ओबीसींचे मोर्चे नाहीत. मराठ्यांनी हक्काचं आरक्षण मिळावं, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पक्षाशी संबंधित न बोलता लोकप्रतिनिधींनी समाजाला न्याय देण्यासाठी काय करू शकता, समाजाची कोणती जबाबदारी घेणार, हे सांगावं. कोणत्याही राजकीय पक्षाला विरोध नाही. आपली भूमिका सांगावी, आम्ही बोलणार नाही, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“स्वबळाची भाषा करण्याआधी फक्त पायाखालची जमीन एकदा तपासून घेतली पाहिजे”

“चव्हाण मुख्यमंत्री असतानाच जनतेनं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारला घरी बसवलं”

देशभरात कोरोना रूग्णसंख्येत कमालीची घट; गेल्या 88 दिवसातील सर्वाधिक कमी रुग्णसंख्या

महाराष्ट्राला जून महिन्यात ‘इतक्या’ लाख लसीचे डोस मिळणार

“तुमचा 51 वर्षीय युवा नेता निवडणुकीत सतत मार खाऊन दाढीची खुंट वाढवत फिरतोय”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More