बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आंबेडकरांच्या ग्रंथाचा दाखला देत ओबींसीची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे; कोल्हेंची मागणी

नवी दिल्ली |  ओबीसी प्रवर्गाची जातिनिहाय जनगणना झालीच पाहिजे, ही मागणी गेली वर्ष होत आहे. अनेक खासदार तसंच विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी तशी मागणी केली आहे. आज राष्ट्रवादीचे खासदार अमोक कोल्हेंनी देखील ओबींसीची स्वतंत्र जातीनिहाय जणगणना झालीच पाहिजे अशी मागणी संसदेत केली.

संसदेत आज झालेल्या चर्चेमध्ये डॉ. कोल्हे यांनी सहभाग नोंदवला. यावेळी 2021 मध्ये जी जनगणना होणार आहे त्यामध्ये जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि त्यामध्ये देखील ओबीसींचा कॉलम स्वतंत्ररित्या समाविष्ट केला जावा, अशी मागणी खासदार कोल्हेंनी केली.

यावेळी कोल्हेंनी बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘हु वेअर द शुद्राज’ या ग्रंथाचा दाखला देत जोपर्यंत ओबीसींची स्वतंत्र जनगणना होणार नाही तोपर्यंत ओबीसी समाज आणि शासनाला देखील त्यांचे खरे प्रश्न समजणार नाहीत, असं म्हटलं.

दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्पात मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाजासाठी विविध योजनांचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात परिस्थितीवर लक्ष देण्याची गरज आहे. विविध योजना यशस्वी होतील जेव्हा शेवटच्या रांगेमधला शेवटा नागरिक लाभार्थी होईल, असं मतंही अमोल कोल्हेंनी चर्चेदरम्यान मांडलं.

 

ट्रेंडिंग बातम्या-

“आदित्यसाहेबांना खासदारकीसाठी मी नाही आवडलो त्यांची चॉईस त्या बाईला”

कोरोनाबद्दल सर्वकाही; IMA कडून महत्त्वाची माहिती जारी

महत्त्वाच्या बातम्या-

मुलांच्या वार्षिक परीक्षांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

कोरोनाच्या कचाट्यातून क्रिकेटही सुटलं नाही; भारत-आफ्रिका वनडे मालिका रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या 4 शहरांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; विधानसभेत मुख्यमंत्र्यांची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More