Top News विदेश

लठ्ठ व्यक्तींनो वेळीच सावध व्हा; संशोधनातून समोर आला मोठा धोका!

Rudd Center

वॉशिंग्टन | कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसवर जगभरात अनेक संशोधनं करण्यात येत आहेत. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरोनाचा लठ्ठ रुग्णांना सामान्य रुग्णांपेक्षा अधिक धोका आहे. त्याचप्रमाणे लठ्ठ लोकांना अतिदक्षता विभामध्ये दाखल करण्याचं प्रमाणही 74 टक्के असल्याचा दावा आंतराष्ट्रीय संशोधकाच्या पथकाने केला आहे.

अमेरिकेतील युनीव्हर्सिटी ऑफ नोर्थ कॅरोलिनाच्या संशोधकांनी जगभरातील 30 पेक्षा अधिक बीएमआय असणाऱ्या रुग्णांवर अभ्यास केला. त्या संशोधनात जवळपास चार लाख रुग्णांची माहिती गोळा करण्यात आली होती.

सामान्यांपेक्षा लठ्ठ लोकांचे रुग्णालयात दाखल होण्याच प्रमाण 113 टक्के अधिक असल्याचा दावाही संशोधन पथकानी केला. तसेच लठ्ठलोकांना इतर सर्व प्रकारचे संसर्ग व आजाराचाही जास्त धोका आहे.

थोडक्यात बातम्या-

“राहुल गांधींची मेहनत वाखणण्याजोगी पण कुठेतरी ते कमी पडतायत”

ईडी दाखवली तर आता सीडीही निघणार; अमोल मिटकरींचा इशारा

…आता महाविकास आघाडीची झोप उडवणार- आशिष शेलार

मला अद्याप ईडीची नोटीस मिळालेली नाही, आल्यावर बोलेन- एकनाथ खडसे

मनसेच्या खळखट्याकनंतर अ‍ॅमेझॉनची माघार; सात दिवसांत मराठी भाषेचा समावेश करणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या