बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

12 पैकी ‘या’ 4 नावांवर राज्यपालांना आक्षेप???; मुख्यमंत्री-राज्यपाल भेटीनंतर चर्चांना उधाण

मुंबई | गेल्या दीड वर्षापासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीवरून वाद निर्माण झाला होता. राज्य सरकारने नामनिर्देशित यादी राज्यपालांकडे पाठवली आहे. परंतु, राज्यपालांनी या यादीवर अद्याप सही केली नसल्यानं राज्य सरकार विरूद्ध राज्यपाल असा वाद रंगला होता. त्यानंतर बुधवारी मुख्यमंत्र्यांनी राज्यालांची भेट घेतली. अशातच मुख्यमंत्री-राज्यपाल भेटीनंतर चर्चांना उधाण आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा चर्चिला गेला. त्यावर आता मोठी माहिती समोर येत आहे. 12 सदस्यांपैकी 4 सदस्यांच्या नावावर राज्यपालांना आक्षेप असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यपालांना आक्षेप असलेल्या सदस्यांच्या यादीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, नितीन बानगुडे आणि यशवंत भिंगे यांचं नाव असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर ठाकरे सरकार देखील या 4 सदस्यांना वगळण्याची तयारी करत असल्याचं सांगितलं जातंय.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचं नाव देखील असल्यानं त्यांचा देखील पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 6 नोव्हेंबर 2020 रोजी राज्यपालंकडे ही यादी सोपवण्यात आली होती. त्यानंतर ठाकरे सरकार नवी यादी राज्यपालांकडे सोपवणार जाण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

‘गायीला राष्ट्रीय पशू घोषित करा, गाईचं कल्याण हेच देशाचं कल्याण’; उच्च न्यायालयाचं मत

सांगलीच्या राजकीय आखाड्यात रंगणार दोन पाटलांची लढत!

“… तेव्हा कुठे गेलता कायदा?, आपला तो बाब्या अन् दुसऱ्याचं ते कार्ट!”

भाजपला आंदोलन भोवलं! चंद्रकांत पाटलांसह महापौरांवर गुन्हा दाखल

“…नाहीतर सप्टेंबरमध्ये कोरोना नियम कडक करावे लागतील”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More